Devendra Fadnavis : महायुतीचं जागावाटप भाजप 26, शिवसेना - राष्ट्रवादी 22 असं ठरलंय ? फडणवीस म्हणाले...

Mahayuti Political News : " ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत, त्यासंदर्भात..."
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

MumbaI News : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युल्यावर मोठं विधान केले आहे. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम स्वरुप देतील असं फडणवीस म्हणाले होते.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितला आहे. यानुसार भाजप 48 पैकी 26 जागा लढवणार आहे.तर शिंदे आणि अजित पवार गट हे उर्वरित 22 जागा लढवणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.पण आता पुन्हा एकदा फडणवीसांनी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर सूचक वक्तव्य केले आहे.

Devendra Fadnavis News
Madha Political News : माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे शरद पवार गटाकडून विधानसभा लढणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी जागावाटपातच्या आपल्या फॉर्म्युल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.मी केवळ एवढंच सांगितलं, जागावाटपाविषयी चर्चा करताना काहीतरी बेसिक लागतं. पण ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत, त्यासंदर्भात विचारविनिमय होईल. आणि समजा काही जागांवर अदलाबदल करण्याची वेळ आली तर त्यावर महायुतीतील घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात जे काही समाज ते सर्व महत्वाचे आहेत. ते सगळे समाज महाराष्ट्राच्या वाटचालीत भागीदार आहेत. म्हणून आमचा असा प्रयत्न आहे की, सुसंस्कृत महाराष्ट्राची विस्कटण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. सामाजिक सलोख्यावर काही परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. माझी तर दोन्ही समाजाच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे की, आपल्या मुद्द्यांवर नक्कीच ठाम राहा, पण समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने कोणीही करू नये असेही फडणवीस म्हणाले.(Lok Sabha Election)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकरांना टोला...

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे बॅरिस्टर आहेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे, की संविधानाचं बेसिक स्टॅक्चर कोणालाही बदलता येणे शक्य नाही.त्यामुळे हा फक्त चुनावी जुमला आहे.कोणाच्या बापालाही संविधान बदलणे शक्य नाही.आमच्यासाठी संविधान हे तितकंच महत्वाचे आहे. त्यामुळे संविधान कुणी बदलू शकत नाही, मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.पण निवडणुका होत असल्याने हे मुद्दे आता तुम्हांला वारंवार ऐकायला मिळतील. पण विरोधकांनी नवे मुद्दे शोधून काढायला हवेत असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल आकडेवारीसह महत्त्वाचे संकेत दिले आहेत.२०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम स्वरुप देतील असं फडणवीस म्हणाले. भाजप २६ जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. असं झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा मिळतील असा कयास बांधला जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis News
Koyna water Issue : पश्चिम महाराष्ट्रातही पाणी पेटणार, संजयकाकांबाबतची नाराजी फडणवीसांना सांगणार; देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com