Pimpri Chinchwad : शरद पवार आणि अजित पवारांवरील भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये येऊ देणार नाही,असा इशारा शहर राष्ट्रवादीने दिला होता. पण, त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून ते शनिवारी (ता.२५) उद्योगनगरी भोसरीत आले.एवढेच नाही, तर घोड्यावर बसले आणि निघूनही गेले. त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली.
यानिमित्त अजित पवार(Ajit Pawar) गटाला डिवचण्याची संधी शरद पवार राष्ट्रवादीने सोडली नाही.अजित पवार गटाचा हा इशारा म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात होता,असा टोला शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी लगावला. तर, पडळकर आल्याचे माहित नव्हते,असा खुलासा यावर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.
त्यावेळी गोपीचंद पडळकरांच्या (Gopichand Padalkar) पवारांवरील आक्षेपार्ह विधानावर राज्यभर राष्ट्रवादीत संतापात लाट उसळली होती.त्यातून त्यांना नाशिक आणि पिंपरी-चिंचवडसह ठिकठिकाणी पाऊल ठेऊ देण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.पिंपरी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनीही हा इशारा दिला होता. त्याचा समाचार कामठेंनी घेतला.
तर, कालपासून शहराबाहेर असल्याचे काटेंनी सांगितले.दरम्यान, काम करत राहायचे, पडळकरांसारख्यांकडे दुर्लक्ष करायचे या अजितदादांच्या सल्यानुसार त्यांच्याविरोधात आंदोलन केले नाही, असे राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. तसेच ते केले असते,तर ते दादांनाच आवडले नसते, असे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंच्या(Mahesh Landge) वाढदिवसानिमित्त देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश आणि अश्व पशुप्रदर्शनाला पडळकरांनी काल हजेरी लावली. यावेळी त्यांना घोड्यावर स्वार व्हायचा मोह आवरता आला नाही.
मात्र, या घोड्याचा लगाम महेश लांडगेंच्या हातात होता. पडळकरांसह अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख संजय जठार यांच्या हस्ते मोशीतील या प्रदर्शनाचे काल उद्घाटन झाले. राष्ट्रवादीने इशारा देऊनही पडळकर शहरात आल्याने त्याची चर्चा झाली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.