Shivendra Raje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendrasinghraje Bhosale : नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्यावर शिवेंद्रसिंहराजेंचं दोनच शब्दात उत्तर, म्हणाले, 'इतिहासकारांनी...'

shivendrasinh raje Nitesh Rane : छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते की नव्हते? यावरून मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

Aslam Shanedivan

Satara News : मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुस्लिम सैनिक नव्हते. तसेच हलाल की झटका मटण अशी वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवून दिलं आहे. यामुळे आता वाद-प्रतिवाद होताना दिसत आहे. नितेश राणे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई इस्लामशी होती, असे वक्तव्य केल्याने आता नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते की नाही? आणि होते तर किती होते असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मुद्द्यासह हलाल की झटका मटण यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असतानाच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? याबाबत ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. पण याबाबत काही इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती मांडली केली आहे. यामुळे अशा चर्चांना हवा देणं किंवा वाद घालण योग्य नसल्याचे म्हटलं आहे.

तसेच नितेश राणे यांनी हलाल की झटका यावरूनही हिंदू समजाला आवाहन करत हिंदू खाटीकांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली होती. यावरूनही आता नवा वाद सुरू झाला आहे. या वादावरही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, हलाल की झटका मटण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला हिंदूकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल आणि ज्याला मुस्लिमांकडून मटन घ्यायचं तो त्यांच्याकडून घेईल.

पण हा वाद उफाळला तो अबू आझमी यांच्यामुळेच. अबू आझमी यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटावर बोलायची गरजच नव्हती. राजकारणासाठी अनेक विषय असूनही या विषयावर त्यांनी राजकारण केलं जे चुकीचं होतं, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?

सपा आमदार अबू आझमींनी छावा चित्रपटावरून चुकीचा इतिहास दाखवला जात असून औरंगजेबाने अनेक मंदिर बनवली. त्यामुळे मी औरंगजेबला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे वक्तव्य केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT