Solapur, 21 July : मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता. 21 जुलै) भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हल्लाबोल केला. तो करत असताना भाजपच्या गुप्त बैठकीचाही भांडाफोड केला. पंढरपुरातील एक घरात पाच ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपचे 65 ते 79 उमेदवार शंभर टक्के पडणार आहेत, अशी चर्चा झाली आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे भाजपच्या विजय पराजयाचे गणित मांडणारी बैठक पंढरपुरातील कोणत्या नेत्याच्या घरी झाली, अशी चर्चा रंगली आहे.
प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाजपच्या अंतर्गत बैठकीतील इतिवृत्ताचा भांडाफोड केला. ते म्हणाले, मराठा समाजाला ठरलेलं आरक्षण द्या. एवढंच आमचं म्हणणं आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्हाला राजकारणात ओढू नका. पण, प्रवीण दरेकर यांच्यासारखे लोक बोलत राहिले तर भाजपला (BJP) 65 ते 79 जागांवर शंभर टक्के नक्की फटका बसेल, हे विसरू नका.
तुम्हाला धडा शिकवण्याची शक्ती माझ्या मराठा समाजात नक्की आहे. लोक एक वेळ एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून देतील, अजित पवार यांचेही उमेदवार निवडून देतील. महाविकास आघाडीचेही उमेदवार निवडून देतील. तुम्हीचे ठराविक लोक निवडून देतील. पण, भाजपच्या 65 ते 79 लोकांचा कार्यक्रम ठरलेला आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले, भाजपचे 65 ते 79 जागांवर नुकसान होण्याचे गणित तुमच्या लोकांनी पंढरपुरात मांडले आहे. कोणाच्या तिथं बसले होते, त्यांनी जरा आपल्या डोक्याच्या किल्ल्या फिरवून बघा. आपल्यात कोण होता, कोणी सांगितलं असेल हे मनोज जरांगेंना.
पंढरपुरात तुमचे पाच ते सात मंत्री एका घरी बसले होते. त्यात काही पराभूत झालेले होते. त्यात चर्चा झाली की, सध्या तरी भाजपचा 65 ते 79 जागांवर दुमता निघणार आहे. ते शंभर टक्के पडणार आहेत. काय करावे आता, अशी चिंता ते व्यक्त करत होते. त्याचे फोटो मला दिलेले आहेत. मुंबईतील भाजपच्या बैठकीतही हाच विषय पुन्हा झाला आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.