Amit Shah on Sharad Pawar : शरद पवार, शरद पवार अन्‌ शरद पवार....अमित शहांकडून 38 मिनिटांच्या भाषणात 10 मिनिटे पवारांचा जप...

Maharashtra BJP Convention : अमित शाह यांनी आपल्या सुमारे 38 मिनिटांच्या भाषणात जवळपास दहा मिनिटे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यातच खर्च केली आणि आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा रोखच स्पष्ट केला.
Sharad Pawar-Amit Shah
Sharad Pawar-Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune, 21 July : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज (ता. 21जुलै) भाजपच्या प्रदेश महाअधिवेशनात जोरदार भाषण झाले. अमित शाह यांनी आपल्या सुमारे 38 मिनिटांच्या भाषणात जवळपास दहा मिनिटे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यातच खर्च केली आणि आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा रोखच स्पष्ट केला. मराठा आरक्षणापासून दूध पावडर आयातीचा निर्णय आणि भ्रष्टाचारापासून साखर कारखान्याचा प्राप्तीकरापर्यंतच्या विषयात शाह यांनी केवळ शरद पवार...शरद पवार आणि शरद पवार असाच धोशा लावला. त्यामुळे भाजपचा प्रचाराचा फोकस पुन्हा शरद पवारांवर असणार हे आजच्या अमित शाह यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.

महाराष्ट्र भाजपचे (Maharashtra BJP) पुण्यात आज अधिवशेन सुरू आहेत. त्या अधिवेशनात सकाळच्या सत्रात प्रदेश स्तरावरील नेत्यांची भाषणे झाली. तसेच, या अधिवेशनासाठी भाजपचे महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade), रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह काही केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र भाजपचे प्रभारी उपस्थित होते. त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अधिवेशनात भाषणे गाजली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची. अमित शाह यांचे दुपारनंतरच्या सत्रात भाषण झाले. त्यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनाच टीकेचे लक्ष्य केले. भाजप सरकारच्या काळात देण्यात येणारे मराठा आरक्षण शरद पवार यांचे सरकार आल्यानंतर गायब कसे हेाते, असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण आणि शरद पवार

शरद पवार नवीनवीन विषय उभे करत आहेत. मी आज पवारांना सांगायला आलो आहे की, भाजप सरकारच्या कालावधीतच मराठ्यांना आरक्षण मिळते. शरद पवारांचे सरकार आल्यावर मराठा आरक्षण गायब होते. देवेंद्र फडणवीसांच्या 2014 मधील सरकारने मराठा आरक्षण दिले होते. मध्येच पवारांचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ते गेले. आताही भाजप सरकारने मराठा आरक्षण दिले आहे, पवारांचे सरकार आल्यावर ते पुन्हा गायब होणार आहे. मराठा आरक्षण टिकण्यासाठी पुन्हा भाजपचे सरकार आणण्याची गरज आहे, असेही अमित शाह यांनी बोलून दाखवले

Sharad Pawar-Amit Shah
Amit Shah : महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे! अमित शाह यांचे सूचक विधान

दूधभुकटी आयातीचा निर्णय अन्‌ शरद पवार

अमित शाह म्हणाले, दूध पावडरच्या आयातीसंदर्भातील नोटिफिकेशन निघाले आहे, तो निर्णयही शरद पवार यांचाच आहे, असे मला वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. शरद पवारांनीच तो निर्णय घेतलेला आहे. आम्ही गेल्या दहा वर्षांत एक किलोही दूध पावडर आयात केलेली नाही. आगामी पाच वर्षांत एक ग्रॅमही दूध पावडर आम्ही आयात करणार नाही. संभ्रम निर्माण करून ते निवडणूक जिंकू पाहत आहेत.

भ्रष्टाचार आणि शरद पवार

भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे शरद पवार हे महामेरू आहेत. याबाबत माझ्या मनात कोणताही शंका नाही. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे. तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता. आता तुमचे खोटे चालणार नाही, असेही त्यांनी शरद पवारांना ठणकावले

Sharad Pawar-Amit Shah
Maharashtra BJP Convention : मला माफ करा म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आमदार, खासदारांचेही कान टोचले!

पवारसाहेब, मुरली मोहोळ तुम्हाला ‘पै न पै’चा हिशेब देतील

तुमचे केंद्र आणि राज्यात सरकार होते. दहा वर्षांत तुम्ही खोट्या आश्वासनांशिवाय काही दिले नाही. ‘यूपीए’च्या काळात महाराष्ट्राला एक लाख 91हजार कोटी रुपये मिळाले होते. पण आमच्या नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा लाख पाच हजार कोटी रुपये दिले आहेत. तुमचा हिशेबावर विश्वास नसेल तर पवारसाहेब पुण्यातील कोणताही एक चौक निश्चित करा, आमचे मुरली मोहोळ तुम्हाला ‘पै ना पै’चा हिशेब देतील. तुम्ही पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई या शहरासाठी काहीही केलेले नाही. या शहरांचा विकास नरेंद्र मोदी सरकारने केला, असा दावाही शाह यांनी केला.

शरद पवार आणि साखर कारखान्यांचा प्राप्तीकर

पवारसाहेब, तुम्ही दहा वर्षे कृषी आणि सहकार मंत्री होता. साखर कारखान्यांचा दहा हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर विभागाचा प्रश्न होता. तुम्ही तो सोडवू शकला नव्हता. मी सहकार मंत्री झाल्यानंतर मोदींकडे गेलो आणि अवघ्या दीड मिनिटात दहा हजार कोटी रुपयांच्या प्राप्तीकराचा प्रश्न सोडवला होता.

Sharad Pawar-Amit Shah
Pandharpur PWP Convention : पंढरपुरातील अधिवेशनातून शेकाप फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com