Manoj Jarange Patil : 'आलेले शिष्टमंडळ फक्त फुकटात चहा पिऊन गेले', मनोज जरांगे पाटील संतापले

Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा समाजाला फडणवीस यांनी जे आरक्षण दिले त्याबद्दल त्यांचे समाजाने 105 आमदार निवडून दिले हे फडणवीस विसरले का ? माझ्या बदनामीसाठी ट्रॅप लावता.
Manoj Jarange
Manoj Jarangesarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Manoj Jarange Patil News: उपोषणाला बसलो की फक्त शिष्टमंडळाला पाठवायचे, चर्चेचे नाटक करायचे हेच सरकारकडून सुरू आहे. आत्तापर्यंत आलेल्या शिष्टमंडळाने काय केले? कोणते निर्णय घेतले सांगा. फक्त येऊन फुकटात चहा पिऊन गेले, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. माझ्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करणाऱ्या प्रवीण दरेकर यांना मंत्री व्हायचे का? असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

अंतरवाली सराटीत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारने चर्चेला पाठवलेल्या शिष्टमंडळासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

शासनाने आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण दरम्यान अंतरवाली सराटीत पाठवलेल्या शिष्टमंडळाने काय केले, कोणता निर्णय घेतला ? मला राजकारण करायचे नाही, मराठा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, आरक्षण द्या, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, नुसत्या गप्पा कशाला हाणता? असे म्हणत सत्ताधाऱ्यांना सुनावले.

Manoj Jarange
Amit Shah : महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे! अमित शाह यांचे सूचक विधान

फडणवीसांवर निशाणा

मराठा समाजाला फडणवीस यांनी जे आरक्षण Maratha Reservation दिले त्याबद्दल त्यांचे समाजाने 105 आमदार निवडून दिले, हे फडणवीस विसरले का ? माझ्या बदनामीसाठी ट्रॅप लावता. फडणवीस यांनी मराठा आमदार आमच्यावर सोडून टीका सुरू केली आहे. मुळ मुद्यावरून भरकटवण्याचा हा त्यांचा डाव मराठे उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरेकरांना मंत्री व्हायचे आहे का?

दरेकरांनी Pravin Darekar कोणाच्या सांगण्यावरून टीका करण्यापेक्षा समोरासमोर यावे. मराठा आणि कुणबी एकच आहे हे मी सिद्ध करून दाखवतो, असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले. तसेच दरेकर यांना मंत्री व्हायचे का? असा चिमटा जरांगे यांनी यावेळी काढला.

चहाची उधारी कोण देणार?

शिष्टमंडळाने इथे येऊन काय केले? हे त्यांना विचारले का? शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले. चहाची उधारी कोण देणार? त्यात त्यांना साखर असलेले बिस्कीट नको, खारे बिस्कीट हवे. पाणी पिऊन गेले, 20 रुपयाला बाटली असते. त्याची उधारी कुठून द्यायची? शिष्टमंडळ नुसते येतात आणि माघारी जातात. शिष्टमंडळाने आतापर्यंत एकतरी केस मागे घेतली का? मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित केला का? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Manoj Jarange
Ajit Pawar : अजित पवारांचं ठरलं; शिंदे-फडणवीसांची साथ सोडणार, विधानसभेनंतर स्वबळावर लढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com