Dilip Sopal- Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Politic's : राजेंद्र राऊतांच्या 20 वर्षांच्या सत्तेला आमदार दिलीप सोपलांचे कडवे चॅलेंज; विश्वास बारबोलेंची साथही मिळणार

ZP-Panchayat Samiti Election : माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या वीस वर्षांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आमदार दिलीप सोपल आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले एकत्र येण्याची शक्यता असून बार्शीत नवे समीकरण निर्माण झाले आहे.

प्रशांत काळे
  1. आरक्षणामुळे महिलांचे वर्चस्व:
    बार्शी पंचायत समितीच्या १२ गणांपैकी सहा महिला राखीव ठरल्याने यावेळी महिला सत्तेवर असणार आहेत; सभापतिपदही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे.

  2. राजकीय समीकरणात बदल:
    माजी आमदार राजेंद्र राऊत यांची वीस वर्षांची सत्ता धोक्यात आली असून, आमदार दिलीप सोपल आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या युतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

  3. आरक्षण फेरबदलामुळे गोंधळ:
    अनेक गणांचे आरक्षण बदलल्याने काही नेत्यांचे गण महिलांसाठी किंवा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने उमेदवार निवडीत गोंधळ निर्माण झाला आहे.

Barshi, 14 October : माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे गेल्या वीस वर्षांपासून बार्शी पंचायत समितीची सत्ता आहे. राऊत यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विद्यमान आमदार दिलीप सोपल काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार सोपलांना यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोलेंचीही साथ मिळण्याची शक्यता आहे.

बार्शी (Barshi) तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या तीन जागांवर महिला, पंचायत समिती गणाच्या सहा जागांवर महिला, तर सभापतिपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण झाल्याने पंचायत समितीवर महिला सत्तेचा कारभार पाहणार आहेत. बार्शी पंचायत समिती आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात पार पडली.

बार्शी पंचायत समितीमध्ये १२ गण असून, अनुसूचित जातीसाठी दोनपैकी एक महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग, तीनपैकी दोन महिला, उर्वरित सर्वसाधारण सात जागांपैकी तीन महिलांना आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. पंचायत समिती (Panchayat Samiti) गणामध्ये अनुसूचित जातीसाठी पांगरी व शेळगाव आर असे दोन गणांपैकी शेळगाव आर आरक्षित करण्यात आला. पांगरी अनुसूचित जाती सर्वसाधारण जाहीर करण्यात आले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन महिलांच्या जागांसाठी उपळाई ठोंगे, आगळगाव, कारी, उपळे दुमाला, गौडगाव, बावी, पानगाव, मालवंडी, सासुरे, मानेगाव अशा दहा गणांमधून चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये कारी, आगळगाव, उपळे दुमाला गणात महिलांसाठी आरक्षण पडले. सर्वसाधारण महिलांसाठी उपळाई ठोंगे, बावी, गौडगाव, पानगाव, मालवंडी, सासुरे, मानेगाव अशा सात गणांतून तीन जागांसाठी चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये मालवंडी, उपळाई ठोंगे, मानेगाव असे आरक्षण देण्यात आले. उर्वरित सासुरे, बावी, गौडगाव, पानगाव असे चार गण खुले आहेत.

जिल्हा परिषदेचे सहा गट असून, उपळाई ठोंगे नागरिकांचा मागास प्रवर्ग, पांगरी, उपळे दुमाला, शेळगाव आर गटासाठी सर्वसाधारण महिला, पानगाव सर्वसाधारण, मालवंडी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. मागील निवडणुकीवेळी असलेले आरक्षण व आता झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये बदल झाले असून, शेळगाव आर गणातून सभापती झालेले अनिल डिसले यांचा गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे.

उपळाई ठोंगे सर्वसाधारणसाठी होता, त्याऐवजी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. आगळगाव सर्वसाधारण महिला होता, आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. पांगरी सर्वसाधारण होता, आता अनुसूचित जाती महिला, कारी नागरिकांचा मागास प्रवर्ग होता तेच आरक्षण राहिले.

उपळे दुमाला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गौडगाव सर्वसाधारण महिलाच आहे तसेच आरक्षण राहिले. बावी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला होता आता सर्वसाधारण झाला, पानगाव सर्वसाधारण महिला आता सर्वसाधारण झाला. मालवंडी सर्वसाधारण पुरुष होता आता सर्वसाधारण महिला झाला.

सासुरे अनुसूचित जाती महिला होता आता सर्वसाधारण झाला. वैरागऐवजी मानेगाव गण होऊन सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. पुरुषांच्या ठिकाणी महिला आरक्षण तसेच इतर आरक्षण पडल्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. तर कुटुंबातील व्यक्तींना उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती, त्यावेळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा दुरंगी सामना झाला होता. माजी मंत्री दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत गटामध्ये झालेल्या लढतीमध्ये भाजपचे सात पंचायत समिती सदस्य, तर राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी दोन्ही पक्षाचे प्रत्येकी तीन सदस्य विजयी झाले होते.

तब्बल नऊ वर्षांनंतर पंचायत समितीची निवडणूक होत असून, गेली वीस वर्षे पंचायत समितीची सत्ता माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आहे. विद्यमान आमदार दिलीप सोपल आहेत तर माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी राहणार आहे.

1. बार्शी पंचायत समितीत यावेळी कोणाचे वर्चस्व राहणार आहे?
महिलांचे, कारण सहा गण आणि सभापतिपद महिलांसाठी राखीव झाले आहे.

2. कोणती प्रमुख राजकीय लढत अपेक्षित आहे?
माजी आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्यातील सामना पुन्हा रंगणार आहे.

3. आरक्षणातील मोठे बदल कोणते झाले?
अनेक सर्वसाधारण गट महिलांसाठी राखीव झाले असून, काही अनुसूचित जाती आणि मागास प्रवर्ग गटांचे आरक्षण बदलले आहे.

4. मागील निवडणुकीत कोणता निकाल लागला होता?
२०१७ मध्ये भाजपचे सात आणि राष्ट्रवादीचे पाच सदस्य पंचायत समितीत निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT