-विशाल गुंजवटे
Jaykumar Gore News : माण-खटावचा Maan- Khatav द्वेष करणाऱ्या रामराजेंनी Ramraje Naik Nimbalkar एमआयडीसी इतरत्र नेण्याचे सर्व प्रयत्न केले. जनतेची दिशाभूल केली. पण कुणालाही माणमधील साधे कस्पटही नेऊन देणार नाही. एमआयडीसी तर नाहीच नाही, असा शब्द मी येथील जनतेला दिला होता, असे सांगून आमदार जयकुमार गोरे म्हणाले, इतके करुनही रामराजे आणि राष्ट्रवादीच्या NCP बगलबचांना नेहमीप्रमाणे तोंडावर आपटावे लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कळीचा मुद्दा ठरलेली मुंबई -बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत अखेर म्हसवड परिसरातच होण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले.माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.
आमदार गोरे म्हणाले, ग्रीन कॉरिडॉरअंतर्गत म्हसवडला औद्योगिक वसाहत मंजूर झाली असतानाही विनाकारण संघर्ष करावा लागला. माण-खटावचा द्वेष करणाऱ्या रामराजेंनी एमआयडीसी इतरत्र नेण्याचे सर्व प्रयत्न केले. जनतेची दिशाभूल केली. अधिकाऱ्यांना इथली परिस्थिती प्रतिकूल असल्याचे चुकीचे रिपोर्ट द्यायला भाग पाडले.
त्यांनीच एमआयडीसी पळवायचे आणि पुन्हा त्यांच्याच काही बगलबचांनी आंदोलन करायचे हा हास्यास्पद खेळही झाला. मी माझे प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत. कुणालाही इथले साधे कस्पटही नेऊन देणार नाही, एमआयडीसी तर नाहीच नाही, असा शब्द जनतेला दिला होता. इतके करुनही रामराजे आणि राष्ट्रवादीच्या बगलबचांना नेहमीप्रमाणे तोंडावर आपटावे लागले.
आता या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होवून येथील हजारोंच्या हाताला काम आणि रोजगार उपलब्ध होईल. पाण्याच्या योजना पूर्णत्वाला जात असल्याने बागायती शेती, साखर कारखानदारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत आहे. ग्रीनफिल्ड हायवे मतदारसंघातून जात असल्याने आणखी आमूलाग्र बदल होवून आपण विकासाच्या नव्या उंचीवर जात आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.