Jaykumar Gore Vs Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore Vs Ramraje Nimbalkar : जयकुमार गोरेंचं रामराजेंना आव्हान, म्हणाले 'हिंमत असेल तर..'

Jaykumar Gore News : 'अनेकवेळा रामराजेंनी माझ्या विरोधात षडयंत्रे रचून..' जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

-विशाल गुंजवटे

Satara District Political News : 'आजपर्यंत जे रामराजेंच्या नादाला लागले त्यांचे वाटोळेच झाले आहे. त्यांना काळाचा महिमा कधी समजलाच नाही. सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणूकीत आम्ही फलटणमध्ये लीड घेऊन त्यांना तोंडावर पाडले. त्याची त्यांना काही वाटत नाही. मी अनेक संस्था वाचवल्या आहेत, मात्र फलटणची मालोजीराजे बँक चालवायला देणाऱ्यांनी, श्रीराम साखर कारखाना, दूध संघासारख्या संस्थांची वाईट अवस्था करणाऱ्यांनी माझ्या नादाला लागू नये.' असा इशारा देत आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली.

दहिवडी येथे सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासद, सेवक परिवर्तन पॅनलच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सर्व नूतन संचालक, सभासद, कर्मचारी आणि ठेवीदार उपस्थित होते.

आमदार जयकुमार गोरे(Jayakumar Gore ) म्हणाले, 'अनेकवेळा रामराजेंनी माझ्या विरोधात षडयंत्रे रचून आणि कारस्थाने करुन मला अडवायचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येक वेळी त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मी कधी कुणाच्या वाटेला गेलो नाही. कुणाचे कधी नुकसान केले नाही. मात्र रामराजेंनी(Ramraje Naik Nimbalkar) आजपर्यंत कधी चांगला विचारच केला नाही. मी नेहमी सत्ताधाऱ्यांविरोधात लढत आलो आहे. त्यांनी कधीतरी सत्तेची कवचकुंडले बाजूला ठेवून माझ्याशी लढाई करावी. ते पालापाचोळ्यासारखे उडून जातील.

त्यांनी सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीत पॅनल उभे केले. त्यांनी मालोजीरजे बॅंक चालवायला दिली, श्रीराम कारखाना, दूधसंघाची वाईट अवस्था केली. त्यांनी त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याचा विचार करावा. जयकुमार बारामती, कराड, फलटणकरांना समजला नाही, त्यामुळे विरोधकांनी माझ्या नादाला लागू नये.

सिध्दनाथ पतसंस्थेत अनेकांनी कष्टाचा पैसा ठेवला आहे. नूतन सर्व संचालक या संस्थेचे सिक्यूरिटी गार्ड आहेत. मी फक्त वॉचमन म्हणून काम करणार आहे. संस्थेत कधीच राजकारण आणणार नाही. संस्था कायमच सभासदांची राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच ...

एकतर मी कुणाच्या वाटेला जात नाही, मात्र माझ्या वाटेला जाणाऱ्यांना सोडत नाही.टप्प्यात आल्यावर त्यांचा कार्यक्रम करतो म्हणून करतोच. माझा अजेंडा पाणी योजना, औद्योगिकरण, सर्वांगीण विकासाचा आहे. त्यात कुणी आडकाठी आणली तर कार्यक्रम ठरलेला आहे हे ध्यानात ठेवा. असा इशाराही आमदार गोरेंनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT