Winter Session : फडणवीसांनीच दुष्काळी भागाला न्याय दिला; आता औंधच्या योजनेस निधी द्या : जयकुमार गोरे

Jaykumar Gore हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात आमदार जयकुमार गोरे बोलत होते
Jaykumar Gore, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Jaykumar Gore, Eknath Shinde, Devendra Fadanvissarkarnama
Published on
Updated on

- विशाल गुंजवटे

Nagpur Winter Session : औंधसह 16 गावांच्या सिंचन योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाण्याचे फेरवाटप करून 30 सप्टेंबर 2023 रोजी अतिरिक्त पाण्याची उपलब्धता करून दिली होती. पाण्याची उपलब्धता झाली असली तरी या योजनेचा सर्व्हे होऊन सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळून निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी माण -खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात केली.

हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात बोलताना आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore म्हणाले की, माझी सरकारला विनंती आहे की, ज्या पद्धतीने जिहे -कठापूरला पैसे दिले, उरमोडीला पैसे दिले. ज्या पद्धतीने टेंभू योजनेला पैसे दिले, त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघातील औंधसह 16 गावांच्या सिंचन योजनेला सर्व्हे करण्यासाठी आदेश झाले पाहिजेत.

सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे व त्या 16 गावांना न्याय मिळून त्या भागातील शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे,अशी आग्रही मागणी आमदार गोरे यांनी सरकारकडे केली. ते म्हणाले, माण -खटाव, जत, कवठेमहांकाळ या भागाना पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशी भूमिका घेणारे राज्यकर्ते या सभागृहाने बघितले आहेत.

जाणते राजे म्हणून ज्यांना कायम ताकद दिली तीही मंडळी म्हणाली की 'पाणीच नाही तर द्यायचे कुठून' अशी परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या सारखा सक्षम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री या महाराष्ट्राला मिळाला आणि नव्याने क्रांतिकारी व धाडशी निर्णय घेऊन दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jaykumar Gore, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Pune News: माजी खासदार शिरोळेंच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

दरम्यान, औंधसह 16 गावातील नागरिकांचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे लागून होते,यामध्ये आ. जयकुमार गोरे यांनी मंगळवारी या योजनेसंदर्भात आग्रही भूमिका मांडताच औंधसह 16 गावांच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Edited By : Umesh Bambare

Jaykumar Gore, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Satara Political News : जिल्हा बँकेची 'ती' भरती अवैध ? भाजपच्या नेत्याने केली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची कोंडी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com