MLA Mahesh Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : महेश शिंदेंची जीभ घसरली; म्हणाले,'महाविकास'ची वज्रमुठ नव्हे वज्रमूत...

Mahesh Shinde शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्सवानिमित्त साताऱ्यातील पोवई नाक्यावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महेश शिंदे त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Satara News : शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खालच्या शब्दांत टीका केली आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ नाही तर वज्रमूत आहे. या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्सवानिमित्त साताऱ्यातील पोवई नाक्यावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महेश शिंदे Mahesh Shinde त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील Mahavikas Aghadi नेत्यांवर खालच्या शब्दात टीका केली.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठी विषयी विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचा अंगठा आहेत. करंगळी हे बोट कशासाठी वापरतात हे सर्वांना ठाऊक आहे. ती करंगळी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत.

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणजे हाताचे मधले बोट आहे. तिसरे बोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असून चौथे बोट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पवारांनी कोणाला कसा अंगठा दाखवला हे आजपर्यंत कोणाला कळाले नाही.

राऊतांची वक्तव्ये म्हणजे खंडीच्या वरणात लघुशंका केल्याचा प्रकार आहे. तिसऱ्या व चौथ्या बोटाने मधल्या बोटाला इतकेच चेपवले आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ नसून ती वज्रमूत आहे. जनता या महाविकास आघाडीला स्वीकारेल असे अजिबात वाटत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT