MLA Shivendraraje Bhosale, Raju Shelke
MLA Shivendraraje Bhosale, Raju Shelke sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Market Committee : आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाविरोधात स्वाभिमानीसह सर्वपक्षीय एकवटले...

Umesh Bambare-Patil

Satara Market Committee : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १८ जागांसाठी तब्बल ६१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale गटाचे २०, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह Swabhimani Shetkari Sanghatna इतर मित्र पक्षांनी मिळून ३५ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीकडून सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आमदार गटाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या गटाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

पाच एप्रिलला अर्जांची छाननी असून, सहा तारखेला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत असल्याने त्या वेळीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. या बाजार समितीवर आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाची सत्ता आहे.

सातारा बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये सोसायटी संस्था गट : शेतकरी सर्वसाधारण २४, सर्वसाधारण महिला पाच, इतर मागासप्रवर्ग दोन, विमुक्त जाती भटक्या जमाती तीन, ग्रामपंचायत सर्वसाधारण गट दहा, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग चार, आर्थिक दुर्बल घटक तीन अर्जांचा समावेश आहे.

यावेळेस आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडून २० अर्ज दाखल झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय यांनी मिळून ३५ अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहा उमेदवार अर्ज दाखल केल्याचे दीपक पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा बाजार समितीत आमदार गटाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय एकवटले आहेत. खासदार गटाने अद्याप या निवडणुकीत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे २० एप्रिलला या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दाखल अर्जांची छाननी पाच एप्रिलला असून, सहा एप्रिलला यादी प्रसिद्ध होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT