Udhav Thackeray, Sunil Rane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना दगा दिला : सुनील राणे भडकले

Sunil Rane आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या महामेळाव्यात आमदार सुनील राणे बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Satara Mill Workers Melava : गिरणी कामगारांची पात्रता निश्चित न झाल्याने अद्याप पाच हजार घरे प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षांत ज्यांच्या घरासमोर म्हाडा आहे, परंतु एकाही गिरणी कामगारांना उद्धव ठाकरे यांनी घराच्या चाव्या दिल्या नाहीत. मराठी माणसांना त्यांनी दगा दिला, अशी टीका कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी साताऱ्यातील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात केली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी उद्धव ठाकरेंवर Udhav Thackeray सडेतोड टीका केली.

यावेळी म्हाडाचे अधिकारी, गिरणी कामगार संघटनेचे विजय चव्हाण, आनंद मोरे, तेजस कुंभार बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा तालुका खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, अरविंद चव्हाण, दिलीप निंबाळकर उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून गिरणी कामगारांचा विराट मेळावा भरला आहे. हजारो कामगार आणि मृत कामगारांचे वारस उपस्थित आहेत. या सर्वांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. या सर्वांना घरे मिळतीलच, यासाठी आपण एकत्रपणे पुढे जाणार आहोत.

ज्यांची कागदपत्रे नाहीत, पण त्यांनी १९८२ पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम केलेले आहे, यांच्याबाबतही आपण सकारात्मक निर्णय घेऊन सर्व गिरणी कामगार, वारस यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गिरणी कामगारांची पात्रता निश्चित न झाल्याने अद्याप 5000 घरे प्रतीक्षेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अडीच वर्षांत ज्यांच्या घरासमोर म्हाडा आहे. परंतु एकही गिरणी कामगारांना उद्धव ठाकरे यांनी घराच्या चाव्या दिल्या नाहीत. मराठी माणसांना त्यांनी दगा दिला. मात्र, गेल्या पाच महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे 1600 गिरणी कामगारांना घराच्या चाव्या प्रदान केल्या आहेत. गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी महायुती सरकार खऱ्या अर्थाने कटिबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT