Satara Political News : गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळवून देणारच : शिवेंद्रसिंहराजेंचा शब्द

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melavasarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : गिरणी कामगारांमुळेच मुंबईची शान वाढली तसेच महत्वही वाढले. पण, आज तेच गिरणी कामगार गेली ४० वर्षे हक्काच्या घरांसाठी झगडत आहेत. कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्या सहकार्याने आपण गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर निश्चितच मार्ग काढणार आहोत. जिल्ह्यातील गिरणी कामगारांना हक्काची घरे लवकरच मिळवून देऊ, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या Mill Workers महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुनील राणे यांच्या माध्यमातून गिरणी कामगारांचे प्रश्न निश्चितच सुटणार आहेत. गिरणी कामगार आणि वारस यांची पात्रता निश्चित करण्यासाठी आज मेळावा घेण्यात आला आहे. याठिकाणी कागदपत्र तपासणीसह ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधाही आपण उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी गिरणी कामगार संघटनेचे विजय चव्हाण, आनंद मोरे, तेजस कुंभार आदी पदाधिकारी, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा तालुका खरेदी- विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, दिलीप निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
Satara Lok Sabha Constituency : नोकरी, समाजकारण ते राजकारण... पुरुषोत्तम जाधव यांचा संघर्षमय प्रवास

या मेळाव्याचा उद्देश फक्त एकच आहे आणि तो म्हणजे गिरणी कामगारांना घरे मिळवून देणे. गिरणी कामगारांच्या इच्छेनुसार नवी मुंबई, वाशी, पुणे, अगदी साताऱ्यातही त्यांना घरे उपलब्ध व्हावीत याबाबत आपण आमदार राणे यांच्याशी चर्चा केली आहे. घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः या कामगारांच्या सोबत आहे.

MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
Pune News: चक्क रंगाच्या कंटेनरमधून दारूची वाहतूक; ‘एक्साईज’कडून एक कोटीचा माल जप्त; राजकीय धागेदोरे...

आमदार राणे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून आज याठिकाणी गिरणी कामगारांचा विराट मेळावा भरला आहे. हजारो कामगार आणि मृत कामगारांचे वारस उपस्थित आहेत. या सर्वांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया आपण सुरू केली आहे. या सर्वांना घरे मिळतीलच यासाठी आपण एकत्रपणे पुढे जाणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
BJP News : निवडणूक अन् राम मंदिराबाबत भाजपची रणनीती ठरणार; अमित शाह, नड्डा घेणार बैठक

ज्यांचे कागदपत्र नाहीत पण, त्यांनी १९८२ पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम केलेले आहे, यांच्याबाबतही आपण सकरात्मक निर्णय घेऊन सर्व गिरणी कामगार, वारस यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहोत. श्री. राणे यांनी गिरणी कामगार यांच्या घरे मिळण्याच्या प्रक्रियेचा आणि आतापर्यंत झालेल्या सोडतीचा आढावा उपस्थित गिरणी कामगारांसमोर मांडला.

MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
Congress News : दक्षिणेत काँग्रेसला बुस्टर डोस; मुख्यमंत्री जगनमोहन यांची बहीण करणार पक्षप्रवेश

यावेळी गिरणी कामगार संघटनेचे विजय चव्हाण, आनंद मोरे, तेजस कुंभार आदी पदाधिकारी, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा तालुका खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, अरविंद चव्हाण, दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

MLA Shivendraraje Bhosale In Mill Workers Melava
Satara NCP News : जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर वळसे-पाटलांनी बोलणं टाळलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com