Solapur, 15 May : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला आज (15 मे) पहाटे मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पुण्याजवळ अपघात झाला. त्यात अपघातात धोत्रे आणि गाडीचालक जखमी झाले आहेत. त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्या गाडीचालक गंभीर जखमी आहे. गाडीतील एअर बॅग उघडल्याने धोत्रे आणि त्यांचा चालक बचावल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी पुण्यात उपचार घेत असलेल्या एका खासगी रुग्णालयात व्हिडिओ जारी करत आपण एकदम ओक्के आहोत. मला काहीही झाले नाही, मी सध्या व्यवस्थित आहे, असे म्हटले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप धोत्रे हे दिल्लीला खासगी कामानिमित्त गेले होते. तेथून ते मुंबईहून पुण्यामार्गे पंढरपूरला (Pandharpur) येत होते. मुंबईहून पुण्याकडे येत असताना द्रूतगती मार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला.
या अघातात धोत्रे यांच्या पायाला, हाताला लागले असून छातीला मुक्कामार लागला आहे. त्यांच्या गाडीचा चालक मात्र गंभीर जखमी झाला आहे. गाडीतील एअर बॅग उघडल्या गेल्यामुळे दोघेही वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धोत्रे आणि त्यांच्या चालकाला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
खुद्द दिलीप धोत्रे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. आपण सध्या व्यवस्थित आहोत. रात्री अपघात झाला होती. मात्र सध्या आपण एकदम ओक्के आहोत. मला काहीही झालेले नाही, असे त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.