Onion Price Issue : कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : केंद्राकडून आजपासूनच 'या' दराने खरेदी सुरू

Devendra Fadnavis announcement : कांद्याचे दर कोसळल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातून मोठी घोषणा केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Satara, 15 May : कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली होती. कांदा एक रुपये दरानेही खरेदी केली जात होती, त्यामुळे कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी साताऱ्यातून मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय ग्रामविकास तथा कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांनी देण्यात आली. त्या कार्यक्रमात फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.

ते म्हणाले, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कांद्याला एक रुपयाचाही भाव मिळत नाही; त्यामुळे शेतकरी कांदा फेकून देत आहेत. तसेच, तो नांगरून टाकत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था पाहून महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांना कांदा खरेदीबाबत विनंती करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis
Pawar on Patel, Tatkare : पटेल, तटकरेंमध्ये काय कर्तृत्व आहे, याची मला कल्पना आहे : पवारांनी सांगितले राजकारणातील दोघांचे महत्व...

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली की, काय वाटेल ते करा पण आमचा (महाराष्ट्राचा) कांदा विकत घ्या. कांदा हे नाशवंत पीक आहे. कांद्याचे आयुष्य काही मोठं नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी करून तो साठवून ठेवणे आणि पुन्हा तो बाजारात आणणे, या सर्व गोष्टी अडचणीच्या असतात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Nitin Gadkari : सोलापूर दौऱ्यात नितीन गडकरींचा महत्वपूर्ण निर्णय : हेलिकॉप्टर प्रवास रद्द करत चारचाकीने अक्कलकोटला रवाना

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीला मान देऊन केंद्र सरकारने आजपासून महाराष्ट्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वामध्ये कांदा १२ रुपये ३५ पैसे दराने खरेदी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निर्णयातून होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com