Solapur, 17 November : तेलंगणात आम्ही शेतकऱ्यांची 18 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. हे पाहण्यासाठी मोदींनी देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना माझ्या राज्यात पाठवावे. त्यांना यायला अडचण असेल तर मी विमान पाठवतो, असे आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी महायुतीच्या नेत्यांना दिले
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी सोलापुरात आले होते. सभेच्या अगोदर माध्यमांशी बोलताना रेवंथ रेड्डी (Revanth Reddy ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी काँग्रेस सरकारने तेलंगणा राज्यात राबविलेल्या योजनांची माहिती दिली.
तेलंगणामध्ये (Telangana) आम्ही 50 हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. ते पाहायचे असेल तर हैद्राबादमधील स्टेडियममध्ये मी त्या सर्व तरुणांना बोलावतो. तुम्ही तपासून पाहा, त्यामध्ये एक जरी कमी नोकरदार मिळाला, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे. मात्र, 50 हजार नोकरदार असेल तर तुम्ही माफी मागावी, असे आव्हान रेड्डी यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांना दिले.
रेड्डी म्हणाले, शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर पाच लाखांचा आम्ही विमा देतोय. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर हा यांचाच जुडवा भाऊ आहे, तेही भाजप महायुतीसारखं आमच्या इथल्या लोकांना लुटत होते, त्यांना जनतेने बदलवलं. केंद्र सरकारमधून एक टीम हैद्राबादला पाठवा. मी सर्व हिशेब द्यायला तयार आहे.
नरेंद्र मोदी, तुम्ही तीन वेळा पंतप्रधान झाला आहात. तुम्ही मोदी गॅरंटीबद्दल बोलत नाहीत. खोटं का बोलत आहात. डबल इंजिन सरकार म्हणजे अदानी प्रदानी. मुंबईला लुटाण्यासाठी धारावी अदानीकडे देण्याचा प्रयत्न आहे. सोनं खरेदी करू शकता. मात्र, धारावीत एक इंचही जागा घेऊ शकत नाही, म्हणून यांना धारावी लुटायची आहे, असेही रेवंथ रेड्डी यांनी सांगितले.
ते म्हणाले, तेलंगणामध्ये आम्ही जातीय जणगणना करतोय, ती पाहायची असेल तर मोदींनी आपली एक टीम पाठवावी. मोदी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वतः लिगली obc मध्ये कॉन्व्हर्ट झाले आहेत. त्यामुळे येत्या 2025 मध्ये जी जनगणना होणार आहे, ती त्यांनी जातनिहाय जनगणना करावी.
मोदी सरकारने 370 रद्द केलं. मात्र, काश्मीरमधल्या जनतेने निवडणुकीतून उत्तर दिलं आहे. प्रत्येक गोष्टीत गांधी परिवाराला कनेक्ट करण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्राचे इलेक्शन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात जातायत, यावरूनच लक्षात येतं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रेवंथ रेड्डी यांनी व्यक्त केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.