Sharad Pawar Madha Sabha: ईडीच्या भीतीने माढ्याचा आमचा गडी कुठं गायब झाला, याचा पत्ताही लागला नाही; पवारांचा बबनदादांवर तिखट हल्ला

Assembly Election 2024 : मला असं वाटलं पंढरपूरनं साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, माढाही तसाच साथ देईल. पण माढ्याचा गडी कुठं गेला, याचा पत्ताच लागला नाही. चौकशी केली. काही लोकांना विचारलं. जवळच्या काही मित्रांना विचारलं, अरं झालं काय, आमचा हा गडी गेला कुठं?
Sharad Pawar-Babanrao Shinde
Sharad Pawar-Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 November : मलाही एके दिवशी ईडीची नोटीस आली होती. मी ईडीच्या कार्यालयात जायचं ठरवलं, त्या वेळी मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी येऊ नका म्हणून हात जोडले. मी येतो म्हटल्यावर ईडीचे अधिकरी माझ्यापुढं हात जोडताहेत आणि आमचा माढ्याचा गडी ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला, याचा पत्तासुद्धा लागला नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संकटकाळात साथ सोडणारे आमदार बबनराव शिंदेंच्यावर टीकास्त्र सोडले.

माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे शरद पवार यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार बबनराव शिंदे यांचा संपूर्ण इतिहासच सांगितला.

ते म्हणाले, आमच्या हातून सत्ता गेली, त्यानंतर आमच्या पक्षात (राष्ट्रवादी काँग्रेस) फाटाफूट झाली. त्या वेळी खरा कोण, साथीदार कोण, जीवाभावाचा कोण, याची परीक्षा आपोआप झाली. पंढरपूरचे अभिजीत पाटील ((Abhijeet Patil)) हे पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि सांगितले, कोणी कुठेही जावो. मी साथ देणार नाही. कितीही संकटं आली तर माझी साथ तुमच्यासोबत आहे.

Sharad Pawar-Babanrao Shinde
Sharad Pawar Sabha : पवारांचा शिंदे बंधूंवर हल्लाबोल; 'आतापर्यंत जे कौतुक झालं ते खूप झालं; यापुढे यत्किंचितही मदत नाही’

मला असं वाटलं की पंढरपूरनं साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, माढाही तसाच साथ देईल. पण माढ्याचा गडी कुठं गेला, याचा पत्ताच लागला नाही. चौकशी केली. काही लोकांना विचारलं. जवळच्या काही मित्रांना विचारलं, अरं झालं काय, आमचा हा गडी गेला कुठं? नाही म्हणाले, थोडी अडचण आहे. कसली अडचण आहे?, तर म्हणाले, ईडीची अडचण आहे. आता हे ईडीच्या अडचणीने पळून जायचं? मलाही एके दिवशी ईडीची नोटीस आली होती. मी ईडीच्या कार्यालयात जायचं ठरवलं, त्या वेळी मला ईडीच्या अधिकाऱ्यांनी येऊ नका हात जोडले, असे पवारांनी नमूद केले.

ते म्हणाले, ईडीचे अधिकरी कार्यालयात येऊ नका म्हणून माझ्यापुढं हात जोडताहेत आणि आमचा माढ्याचा गडी ईडीची नोटीस आल्यानंतर कुठं गायब झाला, याचा पत्तासुद्धा लागला नाही. याचा अर्थ एकच आहे. संकट आल्यानंतर त्याला तोंड देण्याची हिम्मत नाही. ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्यांना कुणाच्या बापाची भीती नाही. आमचे हात स्वच्छ आहेत. कोणी आमच्याबद्दल तक्रार केलेली नाही.

Sharad Pawar-Babanrao Shinde
Shiv sena's Manifesto : शिवसेनेचा ‘वचननामा’ निर्माण करेल का कुटुंबप्रमुखाचे प्रेम?

माझ्याबाबत एकही उदाहरण असं नाही की सोसायटीचं कर्ज तिसऱ्याच्या नावावर काढलं. सोसायटीच्या कर्ज तिसऱ्याच्या नावावर काढून त्याचे पैसे मी उचलले, असे आम्ही कधी केलं नाही. असं जे करतात, त्यांना भीती वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com