Sharad Pawar-Dhairyasheel Mohite Patil-Baliram Sathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil : शरद पवारांनी बळीराम साठेंसाठी ठरवलेला ‘तो’ फॉर्म्युला मोहिते पाटलांना मान्य होणार का?

Baliram Sathe News : राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे यांची उचलबांगडी करत त्या जागी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पद पद्धतीने हटविण्यात आल्याने बळीराम साठे हे कमालीचे दुखावले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 June : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचे बंड थंडावले आहे. खुद्द पवारांनीच सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन जिल्हाध्यक्ष असतील, असे स्पष्ट केले आहेत. या फॉर्म्युल्यानुसार पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्षपद बळीराम साठे यांच्याकडे हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, साठे यांनी शरद पवारांकडून मंजूर करून आणलेला दोन जिल्हाध्यक्षांचा फॉर्म्युला मोहिते पाटील यांना मान्य होणार का, असा सवाल चर्चिला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम साठे (Baliram Sathe) यांची उचलबांगडी करत त्या जागी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदावरून अपमानास्पद पद्धतीने हटविण्यात आल्याने बळीराम साठे हे कमालीचे दुखावले होते. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. खुद्द पवारसाहेबांनी सांगितले तरी आपण आता पक्षात राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

साठे यांच्या राजीनाम्यानंतर माढ्याचे संजय पाटील घाटणेकर यांनी सोलापुरातील घडामोडी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन त्यांच्या कानावर घातल्या होत्या. बळीराम साठे यांच्यासाठी घाटणेकर यांनी पवारांकडे मध्यस्थी केली होती. त्या भेटीत आपण बळीराम साठे यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे घाटणेकर यांच्या भेटीवेळी सांगितले होते.

घाटणेकर यांच्याकडे पवारांनी साठेंना भेटीचा सांगावा धाडला होता. तसेच, पवारांच्या पीएकडून साठे यांना फोन आला होता. भेटीला जाणार नाही, असे म्हणणारे साठे हे शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत गेले होते. माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून नामेदवराव जगताप, बळीराम साठे व इतर नेतेमंडळींनी साथ दिली आहे. त्यात आता फक्त साठे हयात आहेत. त्यामुळे साठे हे मला सोडून कोठेही जाणार नाहीत आणि मीही त्यांना मोकळे सोडणार नाही, असे स्पष्ट केले होते.

बळीराम साठे हे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असतील, हे जाहीरपणे सांगताना त्यांनी सोलापूर राष्ट्रवादीत दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबतचे संकेत दिले. ते देताना पूर्व विभागाची (सोलापूर लोकसभा मतदासंघ) जबाबदारी साठे यांच्याकडे राहील, असे स्पष्ट केले, त्यामुळे भाजपप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही दोन जिल्हाध्यक्ष असणार हे आता स्पष्ट झाले आहे.

बळीराम साठे यांनी पवारांच्या भेटीत एक जिल्हाध्यक्षपद आपल्याकडे राहील, याची तजबीज केली आहे. मात्र, दोन जिल्हाध्यक्षपदाचा फॉर्म्युला मोहिते पाटील मान्य करणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण मोहिते पाटलांवर गंभीर आरोप करूनच साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्वपूर्ण ठरणाऱ्या जिल्हाध्यक्षपदावरील हक्क मोहिते पाटील हे सहजासहजी सोडतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT