
Mumbai News : राज्यात शिवसेना फुटीने अनेकांना धक्का बसला होता. एकनाथ शिंदे यांनी 40 भर आमदार आपल्या सोबत घेत बंड केले होते. त्यांच्या या उठावानंतर सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पडलं होते. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता. या घटनेला आता तीन एक वर्ष होत असतानाच शिवसेनेचे नेते माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर हा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. (Shiv Sena Twist: Raut Was Ready for Guwahati, Claims Shahajibapu Patil)
शहाजीबापू यांनी गुवाहाटीबद्दल सांगताना, सतत टीका करणाऱ्या राऊतांना आमच्याबरोबर गुवाहाटीला यायचे होतं, असा गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांना आमच्याबरोबर यायचं होतं मात्र आमदारांचा विरोध होता, असाही दावा शहाजीबापू यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
शहाजीबापू यांनी, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर 30 ते 35 आमदार त्यांच्याबरोबर होते. यावेळी महाराष्ट्रबाहेर जाणे ठरले होते. त्या पद्धतीने गुवाहाटी येथे जाण्याचे ठरले. त्यावेळी राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी सोबत असणाऱ्या आमदारांनी त्यांना विरोध केला.
या विरोधामुळेच आजही राऊत सतत चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात, असाही आरोप शहाजीबापू यांनी केला आहे. आमच्या शिवसेनेतील आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य असून लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असाही शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर देखील शहाजीबापू यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, सध्या ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणाच्या बातम्या समोर येत आहेत. पण जे उद्धव साहेब काँग्रेससोबत गेलेत त्यांच्याबरोबर जर राज ठाकरे गेले तर त्यांनीही हिंदुत्व सोडले असेच म्हणावे लागेल, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.