Dhananjay Mahadik On Gokul And Satej Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : मुन्नांचे ते चार सवाल गोकुळमध्ये बंटींना अडचणीत टाकणार? चुयेकरांच्या मुलाला बळीचा बकरा केल्याचा दावाही

Dhananjay Mahadik On Gokul And Satej Patil : गोकुळवर महायुतीचा चेअरमन झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका सुरू झाली आहे. गोकुळच्या संचालिका सौमिका महाडिक यांच्यानंतर आता खासदार धनंजय महाडिक यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यात महायुतीचे सरकार असल्याने साहजिकच गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा, अशी इच्छा याआधीच मडाडिक गटाने बोलून दाखवली होती. त्याासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्रालयापर्यंत फिल्डिंड लावली होती. पण मध्यंतरी त्यांच्या या योजनेला सुरूंग लागला होता. मात्र पुन्हा एकदा सुत्रे हालली आणि गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला. या सर्व घडामोडीनंतर आता, गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष व्हावा या भावनेप्रमाणेच अध्यक्ष झाला. ज्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे. तसेच त्यांनी, महाडिक नाव घेतलं की, पाण्यात दिसतो तसा सतेज पाटलांचा मुघलांचा घोडा तयार होतोय. विषय गोकुळचा चालला असताना त्यांना महाडिक म्हटलं की, टँकर, पेट्रोल पंप, कारखाना दिसतोय. ते स्वतःला फार थोर समजत असल्याची टीका महाडिक यांनी केलीय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

गोकुळच्या राजकारणात घडामोडी झाल्या, त्या कुठल्याही प्रकियेत माझा सहभाग नव्हता अशीही कबूली आता खासदार महाडिक यांनी दिली आहे. पण गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा, अशी आपली भावना होती. यापूर्वी महादेव महाडिक व स्वर्गीय पी.एन.पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळचा कारभार गुण्यागोविंदाने चालला होता. मात्र मागील निवडणुकीत सतेज पाटील यांनी तक्तालीन मुख्यमंत्र्यांना सांगून महायुती विरोधात महाविकास आघाडीच पँनेल केलं. आमच्याकडे येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांवर दबाव टाकून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा सहभाग घेवून निवडणूक लढवली आणि एक होवून गोकुळची सत्ता ताब्यात घेतल्याचा असा आरोप महाडिक यांनी यावेळी केला.

यावेळी महाडिक यांनी, गोकुळची निवडणूक लढवत असताना त्यांनी दोनतीन मुद्दे घेवून निवडणूक लढवली, त्याची उत्तर आता सतेज पाटलांनी द्यावीत. महाडिक साहेबांच्या ताब्यात 2019 ला गोकूळ संघ असताना किती ठेवी होत्या? आणि आज 2025 साली किती ठेवी आहेत? हे त्यांनी जाहीर करावं? वासाच्या दुधावरुन ते मिटींगला गोंधळ घालत होते. वासाच दूध परत द्या, असं म्हणत होते. मात्र आता चार वर्ष होत आली असून त्यांनी आतापर्यंत किती वासाचं दुध शेतकऱ्यांना परत दिलं हे देखील जाहीर करावं?

2019-2020 च्या निवडणूकीवेळी 3600 दूध संस्था होत्या. आता काहीतरी 5,500 दूधसंस्था झालेल्या आहेत. या वाढीव दूध संस्थांच्या माध्यमातून किती दुध संकलन होतयं हे जाहीर करावं? नवीन वाढीव दूध संस्था फक्त मतांसाठी केलेल्या आहेत. त्यामुळे दूधसंस्था, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, ग्राहकांच्यावर बोजा न टाकता दोन रुपये दूधदर वाढवून देवू अशी घोषणा केली होती. परंतु आता 12 रुपये वाढवून दिल्याचे सागंत असताना 11-12 रुपयचा फरक दिलेला आहे. तो ग्राहकांच्यावर बोजा टाकून त्यांच्याकडूंन वसुल करुनच शेतकऱ्यांना देत आहेत का? हे खरं आहे की, खोटं आहे का? हे ही त्यांनी जाहीर करावं? असे एका मागोमाग चार सवाल महाडिक यांनी केले आहेत.

या सगळ्यांची श्वेतपत्रिकाच काढावी आणि स्वतः बोलावं. हे त्यांनी स्वतः जाहीर करावं, कुठल्या चमच्यांमार्फत जाहीर करु नये. कोल्हापूर जिल्ह्याचं. गोकुळच नाव देशभर, जगभर आहे. कारण दूध उत्पादक शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. अतिशय परिश्रमातून गोकुळ दूध मोठा झाला आहे. आनंदराव चुयेकर, महादेव महाडिक, अरुण नरके, पी.एन.पाटील, या सगळ्यांनी यासाठी कष्ट घेतलेलं आहेत.

गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीत चुयेकरांच्या मुलग्याचा बळी देण्याचं काम त्यांनी केल्याची टीकाही खासदार धनंजय महाडिक यांनी केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकूळ दूध संघ नावारूपाला आणलेला आहे. मात्र आता काय कारभार चाललाय सगळ्या सभासदांना कळालं आहे. त्यामुळे एक वर्षावर गोकुळची निवडणूक आहे. येणाऱ्या गोकुळच्या निवडणूकीत एक वेगळं चित्र पहायला मिळेल, असाही दावा महाडिक यांनी केला आहे.

गोकुळसह येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणून लढवणार आणि महायुतीचाच झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थावर लागणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ महायुतीचे मंत्री आहेत. त्यामुळे ते आमच्या सोबतच असणार असाही दावा त्यांनी केलाय.

महायुती सरकार अतिशय गतिमान काम करत आहे. राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजूनेतून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 76 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावातील सार्वजनिक वीजबीलं भरण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 251 गावांना याचा फायदा होणार असल्याची माहिती महाडिक यांनी यावेळी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT