Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Vs Ramraje : रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा रामराजेंना टोला; ‘इलेक्शन आलं की प्रत्येकाला...’

Madha Loksabha : महायुतीतील निर्णय वरिष्ठ पातळीवरून ठरत असतो. प्रत्येकाने प्रोटोकाॅल पाळावा.

Vishal Patil

Satara News : ‘इलेक्शन आलं की गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सरपंच होण्याची इच्छा असते. त्यामुळे इच्छा व्यक्त करण्यात काही गैर नाही,’ असा टोला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना लगावला. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत असलेल्या भाजप आणि अजित पवार गटाचे अजूनही मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. (MP Ranjitsinh Naik Nimbalkar's criticism of RamRaje)

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीत शिंदे आणि अजित पवार गट सहभागी आहेत. मात्र, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे किती सख्य आहे, हे जगजाहीर आहे. त्यातूनच साताऱ्यात खासदार निंबाळकरांनी रामराजेंना हा मिश्कील टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा तर उमेदवारीवर दावाच आहे. काही दिवसांपूर्वी मोहिते-पाटलांची रामराजेंनी भेट घेतली होती. या भेटीमुळे महायुतीतील माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. राज्यात अजित पवार गट आणि भाजप एकत्रित असला तरी माढा लोकसभा मतदारसंघातील चित्र सध्या वेगळं पाहायला मिळत आहे. 

खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले की, महायुतीतील निर्णय वरिष्ठ पातळीवरून ठरत असतो. प्रत्येकाने प्रोटोकाॅल पाळावा. माढा लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल, हे मला माहिती नाही. ज्या-त्या पक्षाने आपली भूमिका पाळली पाहिजे. खासदारकीच्या उमेदवारीचा भाजप सर्व्हे, एकदा दिलेलं प्रतिनिधित्व संसद समिती ठरवते. या पक्षात फिल्डिंग वगैरे चालत नाही. वरून जो निर्णय येईल, तो मान्य करून पुढे चालणं याशिवाय दुसरा कुठला मार्ग मला दिसत नाही.

अमितभाई- मोदी या दोघांतील चर्चा तिसऱ्याला कळत नाही...

आमच्या पक्षात अमितभाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या दोघांतील जी चर्चा असते. ती तिसऱ्या कोणाला कळत नाही, बाकीच्या सगळ्या भोमर चर्चा असतात. पण तुमच्यात झालेल्या चर्चेसारखं झालं तर बरं होईल. कार्यकर्ता कायम तयारीत असतो. भाजप लोकसभा निवडणूक खूप गांभीर्याने घेत असते. तयारी कायम ठेवायची असते, प्रात्यक्षिक कुठल्याही क्षणी करायला तयार राहावं लागतं.

महायुतीमधील सगळ्याच पक्षांकडून मागणी होत आहे. शेवटी जनमताची पद्धत भाजपची आहे. निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी दिली जाईल, तो कोणत्या पक्षाचा आहे, त्याला महत्त्व नाही, असे खासदार निंबाळकर म्हणाले.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT