उदयनराजे नकोसे? साताऱ्याचा पुढचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्हावेत...

पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा Udayanraje Bhosale पराभव झाला होता. मात्र, या पराभवाची भरपाई करण्यासाठी भाजपने BJP उदयनराजे भोसले यांना राज्यसभेचे खासदार केले. तसेच त्यांना मंत्रीपदही दिले जाणार होते.
Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosale
Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : फलटण येथील कार्यक्रमात भाजपचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी खळबळजनक विधान केले. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवली. यामुळे विधानामुळे भाजपला आता खासदार उदयनराजे नको आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

फलटण येथे काल रात्री तालुका व शहर भाजप कार्यालयाचे उद्‌घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर तसेच अनुप शहा आदी उपस्थित होते. यावेळी भाषण करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुढच्यावेळी साताऱ्याचे खासदार व्हावेत. या विधानामुळे आता भाजपला उदयनराजेही नको आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Ranjitsinh Nimbalkar, Vikram Pawaskar, Udayanraje Bhosale
भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचा आणि ठेचा : उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांनी २०१९ मध्ये दोनच महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढविली होती. या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवाची भरपाई करण्यासाठी भाजपने उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेतले. तसेच त्यांना मंत्रीपदही दिले जाणार होते. मात्र, ही चर्चा मागे पडली. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकरांनी केलेल्या विधानामुळे सातारा जिल्हा भाजपला उदयनराजे नको आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच केवळ जिल्हाध्यक्षांनाच उदयनराजे नको आहेत की संपूर्ण भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हा निर्णय आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com