MP Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : रणजितसिंह निंबाळकरांची आठवडे बाजारात खरेदी; दिवाळी शुभेच्छा आडून लोकसभेची बांधणी

Ranjitsinh Naik Nimbalkar खासदार रणजितसिंह निंबाळकर माण-खटाव तालुक्यात जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले होते.

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan Political News : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माण तालुक्यातील बिजवडी गावातील आठवडे बाजारात खरेदी करत व्यापारी, छोटे, मोठे दुकानदार यांच्याशी हितगूज केली. यानिमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा आडून त्यांनी आगामी लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात केली आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar आज माण-खटाव तालुक्यात Maan taluka जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी संवाद बैठकांसाठी आले होते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच ते दौऱ्यावर आले असताना बिजवडी (ता. माण) येथे संवाद बैठकीनंतर गावात भरलेल्या आठवडे बाजारात त्यांनी दिवाळीची खरेदी केली. यात रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी,फटाके, सुगंधी उटणे आदी साहित्याची खरेदी केली. खासदार बाजार खरेदी करत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या वेळी त्यांनी व्यावसायिक, दुकानदार, महिला वर्गांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आपुलकीने चौकशी करत त्यांच्या व्यवसायातल्या अडचणी समजून घेतल्या. यानिमित्ताने खासदार निंबाळकर यांनी शुभेच्छांच्या आडून माढा लोकसभेसाठी प्रचाराची सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. Maharshtra Political News

बाजारात माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दिवाळीची खरेदी करण्यासाठी आल्याचे समजताच त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या भागातला खासदार आपल्या बाजारात येऊन दिवाळीची खरेदी करत असताना त्यांच्या साधेपणाचे, आपलेपणाचे जनतेतून कौतुक केले जात होते.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT