Satara Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : काँग्रेस होणार 138 वर्षांची..! जिल्ह्यातून महासंमेलनाला 15 हजार कार्यकर्ते..

Amol Sutar

Satara Political News : अखिल भारतीय काँग्रेसला येत्या 28 डिसेंबरला 138 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त नागपूर येथे काँग्रेसचे महासंम्मेलन होत आहे. या संम्मेलनास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी यांची उपस्थिती राहणार आहे.

या संम्मेलनास सातारा (Satara) जिल्ह्यातून जवळपास 15 हजार कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला जाणार आहेत. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली. काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव अचानक नागपूरला गेल्यामुळे देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसला येत्या 28 डिसेंबरला 138 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त काँग्रेसचे (Congress) महासंम्मेलन होत आहे. या संम्मेलनास प्रत्येक तालुक्यातून एक ते दोन हजार कार्यकर्ते जाणार आहेत. त्यासाठी बस, रेल्वे, खासगी गाड्यांची सोय केली आहे. कराड उत्तर व कोरेगावातून ट्रॅव्हल्सची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातून 15 हजार कार्यकर्ते संमेलनास जातील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. राज्यातून दहा लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबतची आग्रही मागणी केली असल्याचे सांगून देसाई म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या घटक पक्षांच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल.

त्यावेळी ज्या पक्षाचा उमेदवार लोकसभेसाठी दिला जाईल, त्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT