Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagpur winter Session : कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बुलेट ट्रेनसाठी बाजूला? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे 'हे' उत्तर

Amol Sutar

Nagpur winter Session : कराड-चिपळूण रेल्वे मार्ग हा राज्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. याबाबतचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झाला असताना बंदरे मंत्री यांनी याबाबत केंद्राशी केलेल्या पाठपुराव्याची माहिती बैठकीचे आयोजन करुन माहिती देण्यात येईल, असे सांगितले होते. पण यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती संबंधित विभागाकडून मिळाली नाही. या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला जाब विचारला आहे.

सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे, हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना ? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केला. प्रस्तावित कराड (Karad) - चिपळूण रेल्वे मार्ग (Railway Line) हा मराठवाड्याला थेट कोकणशी आणि इतर जिल्हे बंदरांशी जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे; परंतु सरकारला या प्रकल्पाचा विसर पडला आहे.

या प्रकल्पाची काहीच प्रगती दिसून येत नाही. म्हणून बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प थंडबस्त्यात तर टाकला नाही ना? अशाप्रमाणे प्रकल्पासंबंधी लक्षवेधी सूचनेद्वारा पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पाचे 2016 मध्ये भूमिपूजन झाले; परंतु तेव्हापासून या प्रकल्पाचे काय झाले ते कळायला मार्ग नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. याबाबत प्रश्न बजेट अधिवेशनात 21मार्च 2023 रोजी उपस्थित करण्यात आला होता. यावेळी बंदरे मंत्री यांनी याबाबत केंद्रासोबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती राज्य सरकारला देण्यासाठी संबंधित विभागाकडे बैठकीचे आयोजन करुन माहिती देण्यात येईल असे सांगितले होते. पण अद्याप कोणतीही माहिती संबंधित विभागाकडून मिळाली नाही.

बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प रडखला आहे काय, असा सवाल चव्हाण यांनी विचारला. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना सांगितले की, बुलेट ट्रेनशी याचा काही संबंध नाही. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT