Narayan Patil-Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politics ; संजय शिंदेंच्या कार्यपद्धतीवर नारायण पाटलांचा हल्लाबोल; ‘मीच करमाळ्याचा सर्वस्व अन मी सांगेल तीच पूर्वदिशा’

आण्णा काळे

Karmala, 10 October : तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या मुद्द्यावरून करमाळ्याचे राजकारण पेटले आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजय शिंदे यांना आव्हान देताना करमाळ्याचे तहसील कार्यालय शहराच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, आमदार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मीच येथील सर्वस्व असून मी सांगेल तीच पूर्वदिशा असे येथील आमदारांचे वागणे आहे, असा शब्दांत नारायण पाटील यांनी हल्लाबोल केला.

करमाळा तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारत शहराच्या बाहेर हलविण्याच्या विरोधात नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात बोलताना नारायण पाटील यांनी संजय शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

करमाळा तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते नुकतेच झाले. तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारती करमाळा शहराबाहेर असलेल्या मौलाली माळ येथील नवीन जागेत करण्याचे प्रस्तावित आहे. तहसील कार्यालय शहराबाहेर नेण्यास नारायण पाटील आणि शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे आंदोलनात सहभागी नारिकांवरून स्पष्ट झाले.

करमाळा तहसील कार्यालयाबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कानावर घातला आहे. तहसील कार्यालय हे शहरातच करणे नागरिकांच्या सोयीचे असून हे कार्यालय शहराबाहेर हलवण्याचा आमदारांचा हेतू तालुक्यातील जनतेच्या लक्षात आला आहे, असेही नारायण पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, करमाळा तहसील कार्यालय शहराबाहेर हलवण्यास तालुक्यातून विरोध वाढत असून वाढत्या विरोधाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार संजय शिंदे यांनी जनभावना लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे.

दुसरीकडे या शासकीय इमारतीचे टेंडर निघाले असून त्यामुळे करमाळ्यातील जनतेच्या मनात संभ्रमाची अवस्था आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय हे शहरात असावे शहराच्या बाहेर होऊ नये, अशी नागरिकांची भावना आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT