Solapur, 11 November : महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 12 नोव्हेंबर) सोलापुरात येत आहेत. सोलापूरच्या होम मैदानावर मोदी यांची उद्या दुपारी दोनच्या सुमारास सभा होणार आहे. मोदी यांच्या सभेसाठी सोलापुरात तब्बल 1100 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या (ता. १२ नोव्हेंबर) बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी सभा होणार आहे. त्यामुळे मोदी आणि ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सहा मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहे. यात सोलापूर शहर उत्तरमधून विजकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे, माळशिरसमधून राम सातपुते, पंढरपूरमधून समाधान आवताडे या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी प्रचार करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (मंगळवारी) दुपारी दोन वाजता होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. विमानतळ आणि होम मैदानाकडे जाणारे रस्तेही बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त या मार्गावर उद्या सकाळी सातपासूनच तैनात असणार आहे.
सोलापुरातील मोदी यांच्या सभेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. एकूण 1100 पोलिसांचा बंदोबस्त सभेसाठी असणार आहे. यात 150 पोलिस अधिकारी आणि बाहेरील बंदोबस्त 250 पोलिसांचा असणार आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या सभेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, विशेष रुग्णवाहिका, आयसीयूची उपलब्धता यासह 50 पेक्षा अधिक डॉक्टर त्या ठिकाणी असणार आहेत.
दरम्यान, बार्शी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी ठाकरे यांची बार्शीत सभा होणार आहे. यात सभेतून ठाकरे हे पुन्हा एकदा मोदी शहा यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तसेच, बार्शीचे आमदार राजेंद राऊत हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत, त्यावरही ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.