Devendra Fadnavis : काँग्रेसला इशारा देणाऱ्या आडम मास्तरांना फडणवीसांचा सल्ला; सोलापूर शहर मध्य’चे काय आहे राजकारण?

Narsayya Adam Mastar News : आडम मास्तरांना चांगलं कोण आणि वाईट कोण, याची ओळखच पटलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने माजी आमदार नरसय्या आडम यांना चॉकलेट दिलं, त्यामुळे त्या वेळी ते काँग्रेससोबत गेले.
Devendra Fadnavis-Narsayya Adam Mastar
Devendra Fadnavis-Narsayya Adam Mastar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 October : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने न सोडल्याने चिडलेले माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिला आहे. येत्या चार नोव्हेंबर रोजी प्रणिती शिंदे यांच्याबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात, याचा विचार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे, ’ असा सल्ला त्यांनी दिला.

महाविकास आघाडीत असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडावा, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Mastar ) यांनी शेवटपर्यंत प्रयत्न चालवले आहेत. त्यातूनच त्यांनी येत्या चार नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्याच वेळी चार तारखेपर्यंत काँग्रेसने आम्हाला जागा सोडली नाही तर आम्ही पाच तारखेला काँग्रेस विशेषतः खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी गौप्यस्फोट करू, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत काँग्रेसकडून सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून देवेंद्र कोठे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून उमदेवारी मिळेल, या भरवशावर बसलेल्या आडम मास्तर यांना मात्र पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis-Narsayya Adam Mastar
Narsayya Adam Mastar : ‘लोकसभेला 31 जागा मिळाल्याच्या भ्रमात राहू नका; प्रणिती शिंदेंबाबत चार तारखेला गौप्यस्फोट करणार’

आडम मास्तर यांच्या दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आडम मास्तरांना चांगलं कोण आणि वाईट कोण, याची ओळखच पटलेली नाही. आडम मास्तर हे विरोधी विचाराचे असतानाही गरिबाला घर दिले पाहिजे; म्हणून तीस हजार घरं आडम मास्तर यांच्या संस्थेच्या माध्यमातून बांधून दिलेली आहेत.

Devendra Fadnavis-Narsayya Adam Mastar
Ranjitshinh Mohite Patil : रणजितदादा, सांगा तुम्ही नेमके कुणाचे?; राम सातपुतेंच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण...

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने माजी आमदार नरसय्या आडम यांना चॉकलेट दिलं, त्यामुळे त्या वेळी ते काँग्रेससोबत गेले. आता त्यांच्या लक्षात आलं आहे, त्यामुळे पुढं काय करायचं, हे त्यांनी ठरवायचं आहे. कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात, याचा विचार आडम मास्तर यांच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com