Madha Constituency : बबनदादांच्या पाठीशी पांडुरंग परिवार; तर अभिजीत पाटलांना कोकाटे, शिंदेंचे बळ!

Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघाची लढाई ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली असून मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे दोघांनीही ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे माढ्याच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Sanjay Shinde-Bharat Shinde-Abhijeet Patil-Baban Shinde-Prashant Paricharak
Sanjay Shinde-Bharat Shinde-Abhijeet Patil-Baban Shinde-Prashant ParicharakSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 November : माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारसंघाच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 41 गावातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आहे. दुसरीकडे, माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले संजय कोकाटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे माढ्यात शिंदे आणि पाटील यांच्यात काँटे की टक्कर होताना दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघाची (Madha Constituency) लढाई ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली असून मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे दोघांनीही ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे माढ्याच्या लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) यांनी मुलाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंतची सर्व राजकीय पुण्याई कामाला लावली आहे. एक एक मत जोडण्यासाठी ते कठोर परिश्रम घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बबनराव शिंदे यांनी पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत मुलाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती, त्यानुसार परिचारक यांनी आमदार बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Sanjay Shinde-Bharat Shinde-Abhijeet Patil-Baban Shinde-Prashant Paricharak
Dilip Mane : माघारीनंतर दिलीप माने प्रथमच बोलले; ‘वरिष्ठांमुळेच आपल्या वाट्याला उपेक्षा आली...’

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत रणजित शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. त्यात सभेत प्रणव परिचारक यांनी परिचारक आणि शिंदे कुटुंबीयांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे माढा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना परिचारक कुटुंबाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असे सांगितले, त्यामुळे बबनराव शिंदे यांनी माजी आमदार परिचारक यांची घेतलेली भेट फलदायी ठरली आहे.

आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान देणारे अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्यासाठी माढा तालुक्यातूनही बळ मिळत आहे. तुतारीच्या चिन्हावर माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले संजय कोकाटे यांनी शरद पवारांबरोबर कायम राहण्याचा निर्णय घेत अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Sanjay Shinde-Bharat Shinde-Abhijeet Patil-Baban Shinde-Prashant Paricharak
Solapur Maha Aghadi Dispute: जाहीर सभेत कान टोचताच सोलापुरातील काँग्रेस नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; ठाकरेंना दिला ‘हा’ शब्द...

माढ्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनीही अभिजीत पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार असल्याचे सांगितले आहे. परिचारक यांच्या माध्यमातून बबनदादा शिंदे यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले असले तरी अभिजीत पाटील यांनीही माढ्यातून गोळाबेरीज सुरु केली आहे, त्यामुळे माढ्यातून तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com