Chhagan Bhujbal, Narendra Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : नरेंद्र पाटलांचा भुजबळांना सज्जड दम; जरांगेंना डिवचाल, तर जशास तसे उत्तर दिले जाईल...

Narendra Patil मंत्री छगन भुजबळ यांनी कालच्या सभेत जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेला आज माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सडेतोड उत्तर देत भुजबळांना दम भरला.

Umesh Bambare-Patil

Satara Maratha Reservation News : राज्याच्या विविध पदांवर काम करणारे छगन भुजबळ हे आजपर्यंत मराठ्यांना मदत करणारे असल्याचे सांगत होते, पण कालच्या सभेत त्यांची जीभ घसरली. ते पहिल्यापासून मराठाद्वेषी आहेत हे आम्हाला माहिती आहे. जरांगे पाटलांच्या पाठीशी या राज्यातील प्रत्येक मराठा आमदार ठामपणे उभा आहे. जर जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न कराल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.

मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी कालच्या सभेत जरांगे पाटलांवर Jarange Patil खालच्या भाषेत टीका केली होती.या टीकेला आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी सडेतोड उत्तर देत छगन भुजबळांना दम भरला.

नरेंद्र पाटील म्हणाले, छगन भुजबळांनी राज्याच्या विविध पदांवर काम केलेले आहे. मराठ्यांना मदत करणारे म्हणून ते सांगतात, पण कालच्या सभेत त्यांची जीभ घसरली असून, त्यांची वैचारिक भूमिका दिसून आली आहे. ते पहिल्यापासूनच मराठाद्वेषी आहेत दिसून येते आहे.

पण त्यांनी ध्यानात ठेवावे. या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा आमदार जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जरी आम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासमवेत नसलो तरी आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत. भुजबळांनी जरांगेंना कमी समजू नये. Maharashtra Political News

मुळात भुजबळांची शेपटी कशी आहे, हेच कळत नाही. नक्की ते कोणत्या प्राण्यात मोडतात ते त्यांनी सांगावे. पालीसारखे की वाघ, कुत्रा, कोल्हा, हत्तीसारखे. नक्की त्यांच्यातील प्राण्याची व्याख्या त्यांनी सांगावी. मग आम्ही त्यांची कुठं व कशी शिकार करायची हे ठरवू. यापुढे जरांगे पाटलांना डिवचाल तर त्याला सोडणार नाही. त्यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा दमही त्यांनी भरला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT