Mararha Reservation
Mararha Reservationsarkarnama

Satara Maratha Reservation : मराठ्यांच्या राजधानीत ४० हजार कुणबी नोंदी; युद्धपातळीवर तपासणी सुरू

Satara collector आतापर्यंत सातारा जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. यामध्ये १९४८ ते १९६७ पर्यंतच्या सात लाख ९५ हजार, ८६५ नोंदींची तपासणी झाली आहे.
Published on

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांकडून कुणबीच्या नोंदींची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत १२ विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. त्यातून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा ४० हजार ९०९ नोंदींचे पुरावे सापडले आहेत. ज्या तालुक्यात नोंदी सापडल्या आहेत, त्या ठिकाणी दाखले वाटप केले जात आहे.

मराठा समाजाला Maratha Reservation कुणबीचे दाखले देण्यासाठी आवश्यक असलेल्या जुन्या नोंदी तपासण्याचे काम शासनस्तरावरून Satara collector युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील १२ शासकीय विभाग आपापल्याकडील जुन्या दस्तावेजांच्या तपासण्या करून अशा नोंदींचा शोध घेत आहेत.

त्यासाठी तहसील कार्यालयापासून ते नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या जुन्या नोंदी, कारागृहातील जुन्या नोंदी, दस्त नोंदीतील जातीचा उल्लेख आदींची तपासणी होत आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे.

यामध्ये १९४८ ते १९६७ पर्यंतच्या सात लाख ९५ हजार, ८६५ नोंदींची तपासणी केली आहे. १९४८ पूर्वीच्या ११ लाख २३ हजार ४५० नोंदींची तपासणी झाली आहे. यातून एकूण ४० हजार ९०९ कुणबी मराठा व मराठा कुणबी अशा नोंदींचे पुरावे सापडले आहेत. आता ज्या तालुक्यात असे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्या ठिकाणच्या मराठा समाजाला दाखले देण्याचेही काम सुरू आहे. Maharashtra Political News

Mararha Reservation
Satara Political News : अभिजित बिचुकलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 500 रुपयांत घरगुती सिलिंडर द्या...

नोंदी तपासणीचे काम यापुढेही सुरू राहणार आहे. आतापर्यंत सर्व विभागांनी १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. पुरावे सापडले आहेत, त्या तालुक्यात दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा

Edited By : Umesh Bambare

Mararha Reservation
Pune Crime News : पुण्यात 'कोयता गँग'ची हिंमत आणखी वाढली; आता खडकी, चंदननगर भागात तरुणांवर हल्ला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com