Jaydevrao Gaikwad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune Political News : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी ॲड. जयदेवराव गायकवाड

Umesh Bambare-Patil

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीसपदी माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड यांना संधी दिली आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सेलची जबाबदारीही देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. ॲड. गायकवाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याचे निकटवर्तीय मानले जातात. पुणे शहर व परिसरात त्यांनी पक्षाचे काम पाहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड यांनी पुणे शहर व परिसरात काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव व संघटन कौशल्य आहे. त्यांच्या याच कामाचा फायदा राष्ट्रीय स्तरावर भविष्यात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्या या अनुभव व कौशल्याचा उपयोग पक्षाला करता येणार आहे.

तसेच ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar याचे निकटवर्तीय मानले जातात. मध्यंतरी पक्षात सत्ताकारणावरून फूट पडूनदेखील गायकवाड शरद पवार यांच्या बाजूने ठाम राहिले, त्या पद्धतीने पुणे शहरात काम केले. त्याच्या या कामाचा विचार करता पवारसाहेबांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार ॲड. गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची व राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सेलची जबाबदारी दिल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. त्याच्या नियुक्तीबाबतची माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT