Solapur, 05 May : महायुतीमध्ये आगामी विधानसभाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ९० जागा मिळणार आहेत. विद्यमान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एका खासदाराच्या बदल्यात चार जागा मिळाल्या आहेत. साताऱ्यातील जागेच्या बदल्यात आम्हाला राज्यसभेची जागा मिळणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्यस्तरावर चांगला समन्वय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.
उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सोलापूर ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कायमच व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. मग तो पहाटेचा शपथविधी असो अथवा भाजपसोबत युती करण्याचा विषय असो, अशा वेळी अजित पवारांनाच कायम चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वास्तविक भाजपसोबत जाण्याचा आणि त्यांच्यासोबत पदांच्या वाटपासंदर्भातील बोलणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहमतीनेच झाली आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि अनेक उद्योगांच्या उभारणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. त्याच पद्धतीने अजित पवार यांनी कार्यकर्तेही उभारले आहेत. तसेच, बारामतीतील उद्योग व व्यवसाय, सामाजिक कार्य, महिला बचत गट या माध्यमातून सुनेत्रा पवार ह्या कायम सर्वसामान्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बारामतीकरांना सुनेत्रा पवारांची उमेदवारी नवीन नाही. राज्याच्या इतर भागाला मात्र तसे वाटू शकते.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघावरून प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच हे दोन्ही नेते बारामतीत अडकून पडल्याचे दिसून येते. पण, अजित पवार यांनी उभारलेल्या संस्था, आणलेले उद्योग, केलेली विकास कामे आणि जोडलेली माणसं यामुळे बारामतीतून सुनेत्रा पवार या निवडून येतील, असा विश्वास उमेश पाटील यांनी व्यक्त केला.
मोहिते पाटील कुटुंबातील पुढच्या पिढीच्या राजकीय पुनर्वसनासाठी लोकसभा निवडणुकीचा उपयोग केला जात आहे. त्यातूनच माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भावनिक केली जात आहे, असा आरापेही उमेश पाटील यांनी केला. पाटील यांच्यासोबत मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी माने आणि राहुल क्षीरसागर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.