Raju Khare  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Khare : पवारांच्या पक्षाचा सोलापुरातील आमदार पलटी मारणार? म्हणाले ‘हा तुतारीवाला फक्त नावालाच...’

Pandharpur political News : पंढरपूरच्या पांडुरंगाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आपल्या विरोधकांचे पाच-सहाही नगरसेवक निवडून येत नाहीत, असा टोलाही आमदार राजू खरे यांनी पंढरपूरच्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 January : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे पलटी मारणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण पंढपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘हा तुतारीवाला नुसता नावाला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही माझी तेवढीच पत आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील आणि राजू खरे यांचा पंढरपूर (Pandharpur) येथे जाहीर सत्कार करण्यात आला. त्या सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी हे धक्कादायक विधान केले आहे, त्यामुळे खरे यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आमदार राजू खरे म्हणाले, हा तुतारीवाला नुसता नावाला आहे. राज्यातील सत्तासुद्धा आपली आहे. ती सत्ता माझ्या माणसांसाठी निश्चितपणे येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही तेवढीच पत आहे, माझी आणि एकनाथ शिंदेंसोबतही (Eknath Shinde) तेवढीच पत आहे. महाराष्ट्रातील मी एकमेव नशिबवान शिवसैनिक आहे, असा दावाही त्यांनी केला.

पंढरपूरच्या पांडुरंगाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आपल्या विरोधकांचे पाच-सहाही नगरसेवक निवडून येत नाहीत, असा टोलाही आमदार राजू खरे यांनी पंढरपूरच्या नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

यासंदर्भात आमदार राजू खरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मोहोळमध्ये धनुष्यबाण आणि मशालही नव्हती, त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होता. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी शरद पवारांकडे जाऊन मला तुतारीची उमेदवारी मिळवून दिली. मला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद होते, त्यामुळे मी मोहोळमधून आमदार म्हणून निवडून आलो आहे.

विधानसभा निवडणुकीत मोहोळमधून माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी सिद्धी कदम हिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली हेाती. मात्र, महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी बारामतीत येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. राजू खरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी पवारांकडे केली होती, त्यानंतर पवारांनी सिद्धी कदम हिची उमेदवार रद्द करून खरे यांनी उमेदवारी दिली होती.

आमदार खरे मूळचे शिवसैनिक आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी मिळेपर्यंत त्यांची शिंदे यांचे विश्वासू अशीच ओळख होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT