Balasaheb Thackeray News : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तरी संभाजीनगरातील बाळासाहेबांचे स्मारक अपूर्णच!

Despite Uddhav Thackeray and Eknath Shinde becoming Chief Ministers, the memorial of Balasaheb Thackeray in Sambhajinagar remains incomplete. : महापालिकेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा व स्मृतीवन तयार करण्याचा ठराव 31 ऑगस्ट 2016 ला सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता.
Balasaheb Thackeray News
Balasaheb Thackeray NewsShivsena
Published on
Updated on

माधव इतबारे

Shivsena News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर म्हणून ज्या छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख ते आपल्या भाषणात कायम करायचे, त्याच संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे स्मारकाक पाच वर्षात पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे स्वत: अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, आम्हीच त्यांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनीही या स्मारकाकडे लक्ष दिले नाही.

परिणामी दीड वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत असतांना पाच वर्षानंतरही हे स्मारक पूर्ण होऊ शकलेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची उद्या (ता.23) रोजी जयंती आहे. दोन्ही शिवसेनेकडून ती मोठ्या शक्ती प्रदर्शनाने साजरी केली जाणार आहे. स्मारकाचा मात्र सगळ्यानाच विसर पडला, असे दिसते. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पाच वर्षानंतरही अर्धवट अवस्थेत असून, पुतळा तयार होण्यास आणखी आठ ते नऊ महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे 2026 मध्येच स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Shivsena) 35 कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकासाठी दीड वर्षांची मुदत देण्यात आली होती, मात्र कंत्राटदाराला दोन वेळा मुदत वाढ दिल्यानंतरही काम पूर्ण होऊ शकले नाही. महापालिकेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा व स्मृतीवन तयार करण्याचा ठराव 31 ऑगस्ट 2016 ला सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यानुसार सिडको एन-6 येथील प्रियदर्शनी उद्यानातील 7 हेक्टर जागा निश्‍चित करण्यात आली.

Balasaheb Thackeray News
Shivsena UBT News : खैरेंचे लोटांगण, दानवेंची थेट भेट सगळं वाया; 'ते' नगरसेवक पक्ष सोडून जाणारच!

2020 मध्ये निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली. त्यात 16 हजार चौरस फुटात आवश्यक बांधकाम, पार्किंग, आर्ट गॅलरी, बाळासाहेबांचा पुतळा, त्यालगतच भव्य संग्रहालय, स्वच्छतागृह, जागोजागी माहितीचे फलक, सरंक्षण भिंत आदी कामांचा यात समावेश आहे. या कामाला गती मिळावी यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Balasaheb Thackeray News
Municipal Corporation News : भाजपकडून स्वबळावर जोर, शिवसेनेला मात्र एमआयएमची भिती!

कंत्राटादाराला दीड वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती, पण पाच वर्षे पूर्ण होत असताना केवळ 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. सिव्हील काम पूर्णत्वास आले असून, पुतळ्यासंबधीची कामे शिल्लक आहेत. पुतळ्याचे मॉडेल अंतिम झाल्यानंतर आता पुतळा तयार करण्यासाठी किमान आठ ते नऊ महिन्यांचा वेळ लागणार आहे.

Balasaheb Thackeray News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

51 फूट उंचीचा पुतळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 51 फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा ब्रांझ धातूमध्ये तयार केला जाणार आहे. धुळे येथील सरमद क्रिएशनमार्फत शिवसेनाप्रमुखांचा पूर्णाकृती पुतळा बनविण्यात येणार आहे. पुढील वर्षी शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी हे स्मारक शिवसैनिकांसाठी खुले होऊ शकते. दिल्लीच्या डिझाइन फॅक्ट्री ऑफ इंडिया एजन्सीकडून शिवसेनाप्रमुखांच्या जीवनकार्यावर आधारित म्युझियम साकारले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com