Solapur, 22 June : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर उमेश पाटील हे आज प्रथमच मोहोळमध्ये आले होते. या वेळी समर्थकांनी पाटील यांची मोहोळ शहरातून मिरवणूक काढली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आगामी वाटचाल कशी असणार याची चुणूक दाखवून दिली. तसेच, उमेश पाटील यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा मोठा दावा केला आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारणाला वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उमेश पाटील (Umesh Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच आपल्या गावी म्हणजे मोहोळमध्ये आले होते. समर्थकांनी मोठ्या जल्लोषात मोहोळमध्ये स्वागत केले. तसेच त्यांची उघड्या गाडीतून छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली. पाटील यांनी मोहोळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले, त्यानंतर पत्रकार परिषदेतून त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना उमेश पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP)सोलापूर जिल्ह्यातील चारही आमदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी संपर्कात राहणार असून जिल्ह्यात आता विरोधकच नसल्याची परिस्थिती आहे.
राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्या या विधानामुळे सोलापुरात फोडाफाडीचे राजकारण पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सोलापुरातील आमदारांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून सत्तेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा आग्रह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मांडला होता, त्यातच उमेश पाटील यांनी आज केलेल्या दाव्यामुळे सोलापुरातील आमदार अजित पवारांसोबत जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे उमेश पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते. तसेच, उपमुख्यमंत्री पवार यांनी माळशिरसमध्ये उन्हाळी आवर्तन सोडले होते. त्यामुळे जानकर हे अजित पवार यांच्या जवळ गेल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.