Abu Azmi's Statement : आबू आझमी म्हणतात, ‘पालखीमुळे रस्ते जाम होतात’; फडणवीस म्हणतात, ‘त्यांना वादग्रस्त विधानांचा शौक’ (Video)

Palkhi & Traffic Jamm Issue : आबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याचा शौक आहे. कारण, त्यांना असं वाटतंय की वाद्‌ग्रस्त विधाने केल्यानंतर प्रसिद्धी जास्त मिळते.
Devendra Fadnavis-Abu Azmi
Devendra Fadnavis-Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 June : कायम वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे आमदार आबू आझमी यांनी आज (ता. 22 जून) सोलापुरात पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे विधान केले आहे. पालखीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लिमांनी कधी तक्रार केली नाही. रस्त्यावर दहा मिनिटांसाठी नमाजपठण करण्यास मात्र विरोध केला जातो, असे वाद्‌ग्रस्त विधान केले आहे. आबू आझमी यांच्या या विधानामुळे नाव वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आबू आझमी यांच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याचा शौक आहे. कारण, त्यांना असं वाटतंय की वाद्‌ग्रस्त विधाने केल्यानंतर प्रसिद्धी जास्त मिळते. मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, त्यामुळे अशा फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही.

आबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, मुंबईत मशिदीवरील भोंगे उतरविण्याची सध्या मोहिम सुरू आहे. माजी खासदार किरीट सोमय्या पोलिसांना घेऊन प्रत्येक विभागात जातात आणि मशिदींवरील भोंगे काढायला सांगत आहेत. मशिदीवरील भोंगे काढण्याचा कोणताही कायदा नाही. आवाजाच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित मशिदीवर केस करून त्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण, डिसेबलबाबत आम्हाला माहिती नाही. पण सध्याचे भोंगे काढून दुसरे भोंगे लावण्याचे काम केले जात आहे. संपूर्ण देशात भोंगे सुरू आहेत. पण महाराष्ट्रात मात्र मशिदीवरील भोंगे उतरविण्याचे काम जोरात सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis-Abu Azmi
Abu Azmi Attack Nitesh Rane : आबू आझमींचा नीतेश राणेंवर हल्लाबोल; म्हणाले ‘चार फूट का आदमी...उसकी कुछ हैसियत नही है’

आबू आझमी म्हणाले, आम्ही कोणाचीही तक्रार करणार नाही. आम्ही हिंदूंबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो. पण, आज एकाही मुस्लिमाने तक्रार केली नाही की, रस्त्यावर सण का साजरे केले जातात. पण काही मशिदी भरल्या तर काही लोक नमाजासाठी पाच ते दहा मिनिटांसाठी रस्त्यावर येतात. पण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आादित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाजपठण केले तर त्या व्यक्तीचा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायन्सस रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मी आज पुण्याहून सकाळी लवकर येत होतो. त्यावेळी मला काही लोकांनी सांगितले की, पालखी जाणार आहे, त्यामुळे लवकर जावा नाही, तर रस्ता जॅम होईल. रस्ता जाम होतो आहे. पण, आम्ही कधीही त्याबाबत तक्रार केलेली नाही, असा दावा आबू आझमी यांनी केला.

Devendra Fadnavis-Abu Azmi
Abu Azmi : आबू आझमींचे मोठे विधान; ‘राज अन्‌ उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद....’

भारतातील मुस्लिमांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. वक्फ जमिनी आमच्या आहेत. पण त्या हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे ४०० ते ५०० वर्षांपासूनच्या मशिदी आहेत, कब्रस्तान आहे, दर्गाह आहे, ते सर्व पाडून त्या जमिनी सरकारी खात्यात जमा करून त्या विकण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही आबू आझमी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com