
Solapur, 22 June : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्य तथा आमदार आबू आझमी हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. तसेच, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल आहे. ‘एक चार फूट का चुना हुआ आदमी..’ असे म्हणत राणे यांच्यावर आझमी यांनी हल्ला चढविला आहे.
आबू आझमी (Abu Azmi ) म्हणाले, महाराष्ट्रात अलीकडच्या काळात सांप्रदायिकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक चुना हुआ आदमी, चार फूट का है, उसकी कुछ हैसियत नही है; पण जाहीरपणे सांगतो आहे की, आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे. पण हे सरकार धर्मनिरपेक्ष सरकार आहे, असे आम्ही म्हणतोय.
देशात संविधान आहे आणि संविधानाची दोन वेळा शपथ घेणारा माणूस (नीतेश राणे Nitesh Rane एकदा आमदार झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर शपथ घेतो) सांगतोय की आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे. आम्ही मशिदीत घुसून मारणार. मशिदीवरील स्पीकर उतरणार अशा गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत, असेही आझमी म्हणाले.
इस्त्राईल-इराण युद्धासंदर्भात भारताने न्याय केला पाहिजे. आम्हाला वाटतं इराणला पाठिंबा दिला पाहिजे. आताच सरकार आहे ते फक्त निवडणुका जिंकण्यापुरतं आहे. ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोग भाजपच्या हातचं खेळणं झालं आहे, असा आरोपही आबू आझमी यांनी केला.
अमेरिकेच्या इराण हल्ल्यावर आझमी यांनी भाष्य केले. अमेरिका म्हणते, भारत-पाकिस्तान युद्ध आम्ही बंद केले, हा आपला अपमान आहे. इस्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, त्यावेळी अमेरिका काही बोलत नाही. अमेरिका इस्राईलची साथ देते. इस्रायलने पहिला हल्ला इराणवर केला, असेही आझमी यांनी स्पष्ट केले.
आमदार आझमी म्हणाले, इराणचं अभिनंदन करतो, कारण पन्नास वर्षांचा जो व्यक्ती आहे, त्याचे आजोबा भारतात जन्माला आले. त्याच्यात भारताचं रक्त आहे, त्यामुळे आम्ही इराणसोबत उभे आहोत.
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबल देण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. त्यावर आझमी म्हणाले, पाकिस्तान असं मानत असेल की, भारत पाकिस्तानचे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनीच बंद केलं..पण, ते आम्ही मान्य करत नाही. पण काही लोक स्वतःची शस्त्र विकण्यासाठी लोकांच्या हत्या करत असतील, तर त्याची निंदा झाली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.