Arjunsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohit Patil : मोहिते पाटलांनी ZP तील ‘स्वीकृत’साठी डाव टाकला; देशमुख, पाटील, भालके मदत करणार?

Mohite Patil plans move for ZP nominated position : सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाने स्वतंत्र गटनोंदणी केली आहे. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

प्रमोद बोडके

Solapur, 07 May : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी मात्र स्वतंत्रपणे केली आहे. माळशिरसमधून विजयी झालेल्या पक्षाच्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे. गटनेतेपदी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपगटनेते म्हणून गौतम माने यांना संधी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत आता स्वीकृत सदस्य नेमले जाणार आहेत. या निवडीत गटनेत्यांच्या शिफारशीला मोठे महत्त्व असल्याने गटनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीत मोहिते-पाटील (Mohite Patil) गटाच्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे. या सातव्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह आघाड्यांनी गणित जमवले तर त्यांना ही जागा मिळू शकते.

जिल्हा परिषदेचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी करणे बंधनकारक आहे. माळशिरस तालुक्यात भाजपच्या विरोधात लढताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP SP) आघाडी केली होती.

या आघाडीने माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. या सात जागांमध्ये शिवसेनेचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच सदस्य विजयी झाले आहेत. यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे.

चार पक्ष आणि तीन आघाड्यांत रस्सीखेच

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनोंदणी केली आहे. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या चार पक्षांचा समावेश आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या सदस्यांनी करमाळा तालुका विकास आघाडी, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सदस्यांनी सांगोला तालुका विकास आघाडीने नोंदणी केली आहे.

आमदार देशमुख, आमदार नारायण पाटील व भगीरथ भालके यांच्या सहा सदस्यांनी एकत्र येऊन सोलापूर विकास आघाडीचीही नोंदणी केली आहे. सध्या चार पक्षांचे चार गट व तीन आघाड्यांची नोंदणी झालेली आहे. गटनोंदणीसाठी शनिवारपर्यंत (ता. ९) अंतिम मुदत असणार आहे.

सातवी जागा कोणाला?

जिल्हा परिषदेत आता १० सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. सोलापूर झेडपीतील संख्याबळ पाहता भाजपला चार, शिवसेनेला एक व राष्ट्रवादीला एक अशा स्वीकृतच्या जागा मिळू शकतात.

आणखी एक सदस्य स्वीकृत सोलापूर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याची संधी आहे. आघाड्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने व्यवस्थित गणित जुळविल्यास सातव्या जागेची लॉटरी लागू शकते; अन्यथा जिल्हा परिषदेत सहाच सदस्य स्वीकृत सदस्य होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT