Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर; खासदार धैर्यशील म्हणाले, ‘आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही का?’

Shivsena News : मोहिते पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढत्या जवळिकीमुळे शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
Dhairyasheel Mohite Patil-Eknath Shinde
Dhairyasheel Mohite Patil-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 May : गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जवळीक वाढत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही शिंदे यांची भेट घेतली. तसेच, माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बहुमत असूनही त्यांनी शिंदेसेनेचा सभापती केला. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे, त्याबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांनीच भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही भेटायचं नाही का? असा सवालच त्यांनी केला.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून लढविलेल्या आहेत. मी खासदार म्हणून काम करतोय आणि माझ्या मतदारसंघातील नगरपालिकांचे प्रश्न उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील तर मी त्यांच्याकडं काम घेऊन जायचं नाही का?

माढा मतदारसंघात आम्ही वैचारिकदृष्ट्या एकत्रित आलो आहोत. फलटणमध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती करून नगरपालिका निवडणूक लढवली आहे. तसेच, माण आणि खटाव तालुक्यातही एकत्र लढत आहोत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून सध्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर युती करून लढतोय, आम्ही त्यांना भेटायचं नाही का? असा सवाल मोहिते पाटील यांनी केला.

माळशिरस पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे बहुमत असताना शिवसेनेचा सभापती का करण्यात आला? त्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सभापती दत्ता मगर यांचे आजोबा हे शंकरराव मोहिते पाटील यांचे घनिष्ठ सहकारी होते. मगरांची तिसरी पिढी आजही आमच्यासोबत आहे. त्यांनी आमच्या विरोधकांना मोहिते पाटलांचे विरोधक आहेत; म्हणून लग्नाची पत्रिका, सुखदुःखाची पत्रिकाही दिलेली नाही.

Dhairyasheel Mohite Patil-Eknath Shinde
Nasrapur Pune Child Rape : "बाप म्हणवून घेण्याचीही लाज वाटतेय!" नसरापूर प्रकरणातील आरोपीला स्वतःच्याच मुलाने नाकारलं; पत्नीचीही जिवंत जाळण्याची मागणी

पक्ष कुठला असला तरी शेवटी तो मोहिते पाटील समर्थक

आम्ही सभापती केलेले दत्ता मगर हे केवळ शिंदेसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्याला आम्ही सभापती करायचं नाही का? तोच एकमेव खुल्या गटातून निवडून आलेला आहे. त्याचा पक्ष कुठलाही असला तरी सगळ्यात शेवटी तो मोहिते पाटील समर्थक आहे, अशी कबुलीही खासदार मोहिते पाटील यांनी दिली.

Dhairyasheel Mohite Patil-Eknath Shinde
Atul Save News: मंत्री अतुल सावे यांच्या माजी ओएसडीवर गुन्हा; पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, मुलालाही बॅटने मारहाण?

बंगालमध्ये भाजपचं सरकार कसं आलंय, हे सर्व देशाला माहितीय...

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं आलं आहे, हे सर्व देशाला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील ९० लाख मतदार गायब केले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com