Ambadas Danve News : संख्येने कमी झालो असलो तरी संपलेलो नाही; पुन्हा फिनिक्स भरारी घेण्याचा अंबादास दानवेंचा दावा!

Ambadas Danve statement News : बिनविरोध निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे यांचे उत्साहात स्वागत झाले, यावेळी त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कणखर आहे, भलेही आमच्या जागा कमी झाल्या असतील. आम्ही संख्येने कमी झालो असलो तरी संपलेलो नाही. फिनिक्स पक्षी जसा राखेतून पुन्हा भरारी घेतो, तशी भरारी आम्ही पुन्हा घेऊ, असा विश्वास विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. बिनविरोध निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे यांचे उत्साहात स्वागत झाले, यावेळी त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

तीन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाख दोन शिवसेना (Shivsena) राज्यात निर्माण झाल्या. पक्ष फुटीचा फटका निश्चितच उद्धव ठाकरे यांना बसला. शिंदे यांना सत्तेचा फायदा झाल्यामुळे त्यांनी आपला पक्ष भक्कम केला. ठाकरेंच्या शिवसेनेला शिल्लक सेना म्हणून हिणवले गेले, पण या पक्षाने फुटीनंतरही आपली ताकद थोड्याफार प्रमाणत दाखवली हे नाकारून चालणार नाही.

Ambadas Danve
Chandrakant Khaire On Ambadas Danve : "अंबादास दानवे नशिबवान, कारण..." चंद्रकांत खैरेंनी दानवेंसाठी नेमकी काय केली भविष्यवाणी

महाविकास आघाडीमुळे लोकसभेत ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले होते. तर विधानसभेत या पक्षाचे वीस आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची कामगिरी खालावली असली तरी छत्रपती संभाजीनगर महापालिका, जिल्हा परिषदेत चांगले नगरसेवक, सदस्य आहेत. परभणी महापालिकेत तर या पक्षाची सत्ता आणि महापौरही आहे.

Ambadas Danve
Bachchu Kadu News:धनुष्यबाण हाती घेताच बच्चू कडूंना ठाकरेंच्या खासदारानं डिवचलं; म्हणाले,'विधानसभेला निवडून यायची त्यांची क्षमता संपली..?'

मात्र पक्षाला फुटीचे लागलेले ग्रहण अद्यापही संपलेले नाही. परभणीचे खासदार संजय जाधव कोणत्याही क्षणी पक्षाला जय महाराष्ट्र करू शकतात. अशावेळी विधान परिषदेत रिक्त झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या जागेवर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठवाड्यात पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न होता. बिनविरोध आमदार झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवताच अंबादास दानवे यांनी नव्याने भरारी घेण्याचा निर्धार बोलून दाखवला.

Ambadas Danve
MLC Election: विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदेंचा पडद्यामागं धक्कादायक प्लॅन सुरू; शिवसेनेच्या बड्या नेत्याने फोडली आतली बातमी

आम्ही संपलेलो नाही, निश्चितच संख्येने आम्ही कमी आहोत, पण पुन्हा राखेतून फिनिक्स भरारी घेऊ. आमचा कार्यकर्ता, शिवसैनिक जीवाचं रान करून मेहनत घेतोच, आता त्याला आम्ही तांत्रिक बांबीची जोड देऊन संघटना अधिक मजबूत करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पक्षाचे ध्येय धोरण गावागावात, घरोघरी घेऊन जाऊ, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

Ambadas Danve
Ambadas Danve News : मराठवाड्यात मशाल पेटती ठेवण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी दिले अंबादास दानवेंना बळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com