Solapur, 07 February : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि अकरा पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज (ता. 07 फेब्रुवारी) चुरशीने मतदान झाले. सकाळी साडेसातपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत 58.39 टक्के मतदान झाले आहे. साडेपाचनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या, त्यामुळे यात वाढ होऊ शकते.
दरम्यान, वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ते रात्री साडेआठपर्यंत सुरू होते. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते.
माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) स्वबळावर झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर लढत होत आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी या वेळी एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे माळशिरसमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे.
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेळापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री गोसावी यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ सुरुवातीला आमदार उत्तम जानकर यांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली. या वेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झाले होते.
आमदार जानकर यांच्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही वेळापूर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर आमदार आणि खासदारांनी पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्याशी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्यांनी मारहाणीची चौकशी करण्यात येईल, आमदार-खासदारांनी ठिय्या आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. अधीक्षकांच्या विनंतीनंतर मोहिते पाटील आणि जानकर यांनी आंदोलन मागे घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.