Sushil Kshirsagar-yashwant mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politic's : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार धांदात खोटे बोलत आहेत; भाजप पदाधिकाऱ्याची खरमरीत टीका

यशवंत माने हे नागरिकांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी हा उद्योग थांबवावा.

राजकुमार शहा

Mohol News : मोहोळ विधान सभा मतदार संघात विविध ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत. मात्र, मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार यशवंत माने हे ती कामे मीच मंजूर करून आणली असून, कोट्यवधीचे आकडे सांगून बिनधास्त उद्‌घाटने करीत आहेत. ते धांदात खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. हा उद्योग त्यांनी थांबवावा, अशी टीका मोहोळ विधानसभा मतदार संघाचे नूतन संयोजक तथा भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी केला. (NCP's Mohol MLAs are telling lies: Sushil Kshirsagar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा व पुढील नियोजना बाबत आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर माहिती देत होते. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी ‘महा जनसंपर्क अभियान’ हा उपक्रम सुरू केला आहे. सर्वसामान्यांची अनेक छोटी मोठी कामे झाली आहेत. मात्र ती जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. दहशतमुक्त भारत ही त्यांची संकल्पना आहे. एकूण 14 प्रकारचे विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

मोहोळ शहरातील कन्या चौकातील फ्लाय ओव्हर, जलजीवन मिशनची गेल्या दोन वर्षांपासून कामे सुरू आहेत, मोफत धान्य, काश्मीरमधील कलम ३७० कलम रद्द करणे, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री सन्मान योजना, उज्ज्वला गॅस या सह २२० कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लस दिली. अशी भरीव कामे त्यांनी केली आहेत.

भाजपचे (BJP) तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदींनी भारताचा जागतिक दर्जा उंचावला आहे. येत्या विधानसभेचा आमदार हा भाजपचाच असेल. मोहोळ तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा असा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्नही मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अंकुश अवताडे, दीपक गवळी, रणजीत चवरे, बाळासाहेब पाटील, नागेश क्षीरसागर, शशिकांत गावडे, विष्णू चव्हाण, गणेश झाडे, भारत आवारे, आदी सह भाजपचे कार्यकर्ते व विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT