पंढरपूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पंढरपूर (Pandharpur) तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख (Vijaysingh Deshmukh) यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे उद्या ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. देशमुख यांच्या या निर्णयामुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात गेला आहे. (NCP's Pandharpur taluka president Vijaysingh Deshmukh resigns)
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीपासून राष्ट्रवादीमध्ये सुंदोपसुंदी सुरु आहे. त्यातच अनेक गट तट पडले आहेत. त्यामुऴे पंढरपूर व मंगळवेढ्यात पक्षाची राजकीय ताकद क्षीण झाली आहे. दुसरीकडे, पंढरपूर विधानसभा मतदार संघात महत्वाची भूमिका पार पाडणारे कासेगावचे विजयसिंह देशमुख यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याशी जवळीक साधली आहे.
अलीकडेच देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात भगीरथ भालके यांच्यावर टीक करत आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी विजयसिंह देशमुख यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा नामोल्लेख टाळला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने या बॅनरची गंभीर दखल घेवून कारवाईचे संकेत दिले होते. त्यापूर्वीच देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या पंढरपूरला येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदाचा त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादीसमोर पंढरपूर मंगळवेढ्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राष्ट्रवादीत गट-तट; काम करणे अडचणीचे
आमदार समाधान आवताडे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांनी गटा तटाचा विचार न करता, सर्वसामान्यांसाठी कासेगाव परिसरातील विकास कामांना साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक गट-तट निर्माण झाले आहेत. त्यामुळे काम करताना मोठी अचडणी निर्माण झाली होती. त्यामुळे आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. लवकरच कासेगाव येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मोठा शेतकरी मेळावा घेणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.