Nitin Gadkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या आईंची काय होती इच्छा; मृत्यूच्या सहा महिने आधी काय सांगितले होते?

Assembly Election 2024 : मागच्या 10 वर्षांत 937 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त महामार्ग ज्या जिल्ह्यात झाले तो जिल्हा म्हणजे सोलापूर.

विश्वभूषण लिमये

Solapur, 16 November : माझी आई तिच्या मृत्यूच्या सहा महिने अगोदर सोलापुरात आली होती. तेव्हा ती तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला गेली होती. त्यावेळी तिने मला सांगितले होते की ‘नितीन, आपल्या धर्माचे लोक एवढ्या श्रद्धेने या तीर्थक्षेत्राला येतात. पण, तेथील रस्ते चांगले नाहीत. अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता तर प्रचंड खराब असून माझी कंबर लचकून गेली आहे. तुला परमेश्वराने कधी संधी दिली, तर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाणारे रस्ते जरूर चांगले कर, अशी इच्छा व्यक्त केली होती. नशिबाने मला रस्ते बांधणी मंत्रालय मिळाले आणि महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते करत आईची इच्छा पूर्ण केली, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ निमित्त सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. ते म्हणाले, मागच्या 10 वर्षांत 937 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त महामार्ग ज्या जिल्ह्यात झाले तो जिल्हा म्हणजे सोलापूर.

त्या वेळी जवळपास ३५ कामे होती, त्यातील १९ कामे पूर्ण झाली असून १६ कामे प्रगतीपथावर आहेत. सोलापूरमध्ये (Solapur) आतापर्यंत १८ हजार कोटींची कामे झाली असून पुढच्या काळात आणखी पाच हजार कोटींची कामे होतील, असा मला विश्वास आहे.

माझी आई मृत्यूपूर्वी सहा महिने आधी सोलापुरात आली होती. तेव्हा ती तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूरला जाऊन आली होती. तिने त्यावेळी मला सांगितलं की नितीन, आपल्या धर्माचे लोक एवढ्या श्रद्धेने त्या ठिकाणी येतात.

पण, तेथील रस्ते चांगले नाहीत. अक्कलकोट ते गाणगापूर हा रस्ता तर प्रचंड खराब आहे. तुला परमेश्वराने संधी दिली तर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारे रस्ते जरूर चांगले कर, अशी इच्छा आईने व्यक्त केली होती, असे गडकरींनी नमूद केले.

ज्या वेळी मी मंत्री झालो, त्या वेळी एक गोष्ट लक्षात आली की आपल्या देशाची संस्कृती, इतिहास आणि विरासत ही आपल्या तीर्थक्षेत्राशी संबंधित आहे. समाजाला दिशा देणाऱ्या संतांचे ज्ञानपीठ त्या ठिकाणी आहे. मी मंत्री झालो आणि रस्ते बांधणी मंत्रालयात काम करण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्रातील सर्व तीर्थस्थळांना मजबूत रस्त्याने जोडण्याचे भाग्य मला मिळाले, माझ्या आयुष्यातील तो भाग्याचा क्षण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. श्रीनगर ते काश्मीरपर्यंत 19 टनेल बनून पूर्ण झाले आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीला रस्त्याने जोडण्याचे कामही मला करता आले, याचा आनंद आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT