Barshi, 16 November : विधानसभा मतदानाला अवघे काही दिवस उरले असतानाच बार्शी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार, माजी मंत्री दिलीप सोपल यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक नागेश अक्कलकोट हे अडचणीत सापडले आहेत. बेनामी संपत्तीप्रकरणी अक्कलकोटे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ॲन्टी करप्शन ब्यूरो) तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. महिनाभरात दुसरी कारवाई झाल्याने बार्शीत खळबळ उडाली आहे.
बार्शी (Barshi) नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आणि त्यांच्या पत्नी कल्पना अक्कलकोटे यांच्याविरोधात ॲन्टी करप्शन ब्यूरोने गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर बार्शीतील अनिल डिसले (Anil Disle ) आणि त्यांची पत्नी व मुले यांच्यावरही 9 कोटी 69 लाख रुपये बेनामी संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर 15 ते 20 दिवसांनंतर बार्शीत नागेश अक्कलकोटे या नेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption action ) कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
नागेश अक्कलकोटे हे राजकारणात येण्यापूर्वी एका शिक्षण संस्थेत शिक्षक होते. मात्र, ते शिक्षकाचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय झाले होते. नगरसेवकपदाच्या 9 जून 2001 ते 31 ऑगस्ट 2022 या 22 वर्षांच्या कालावधीत नागेश अक्कलकोटे यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिकची मालमत्ता जमा केल्याचे तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्या तक्रारीनुसार अक्कलकोटे कुटुंबीयांनी उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा सुमारे 122.77 टक्के जास्त म्हणजेच 11 कोटी 12 लाख 13 हजार 816 रुपये जास्तीची मालमत्ता बाळगल्याचे सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई दिसून आले आहे.
अक्कलकोटे यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ही अधिकची संपत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे लाचलुचपत विभागाने अक्कलकोटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही संपत्ती बेनामी असल्याचे माहिती असूनही त्यांची पत्नी कल्पना अक्कलकोटे यांनी पतीला मदत केल्याच्या कारणावरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच अनिल डिसले यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती, त्यामुळे निवडणूक काळात बार्शीतील दोन राजकीय नेत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.