Eknath Shinde, Sanjay Mandalik, Prakash Abitkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : संजय मंडलिक यांनाच उमेदवारी द्या; 'या' आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Prakash Abitkar खासदारकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्यावतीने आमदार आबिटकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित समजल्यानंतर महायुतीने देखील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत सतर्क झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे हाय कमांड प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारी बदलीच्या हालचाली सुरू आहेत. मतदारसंघात असलेली नाराजी याचा फटका विद्यमान खासदारांना बसण्याची शक्यता दाट आहे.

त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार आणि मंडलिक यांचे खंदे समर्थक आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्र काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांचे खासदार म्हणून खासदार संजयदादा मंडलिक यांची ओळख आहे.

त्यांनी खासदरकीच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असून त्यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक प्रेमींच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक व राजकारणामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे योगदान मोठे आहे.

स्वर्गीय खासदार मंडलिक साहेबांना माननारा मोठा वर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ही स्वाभीमानी जनता विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक यांच्या मागे ठामपणे उभी असून त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही सर्व जनता कंबर कसून कामाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या समाजकारण, राजकारण सहकारामध्ये संजय मंडलिक यांची एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्याच्या राजकारण सहकारामध्ये सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रकगतीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा विकासाचा आलेख वेगाने वाढतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांनी खासदरकीच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेवून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास केला असून त्यांचेकडे सर्वसमावेशक नेवृत्व कोल्हापूर जिल्हा पाहत होता. आता त्यांच्या नंतर खासदार संजयदादा मंडलिक यांचेकडे सुध्दा सर्वसमावेशक नेवृत्व म्हणून कोल्हापूर जिल्हा बघत असून त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेची उमेदवारी द्या अशी मागणी मंडलिक प्रेमी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT