Kolhapur News : प्रकाश आंबेडकर 'मविआ'ला झटका देणार? म्हणाले, ...तर वंचित स्वतंत्र लढणार!

Mahavikas Aghadi उद्या (शनिवारी) आम्ही मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार आहेत. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घोषित करणार आहोत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi News : महाविकास आघाडीत जागावाटपावरून अद्यापही मतभेद आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात १५ जागांवरील तिढा अजून सुटलेला नाही. त्यांचा निर्णय झाल्यावरच वंचितचा निर्णय आम्ही जाहीर करू. त्यांची भांडणं मिटली तरच आम्ही आमचा प्रस्ताव देऊ. अन्यथा वंचित आघाडी लोकसभा स्वतंत्र लढेल, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केले.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात १५ जागांवरील तिढा अजून सुटलेला नाही. त्यांचा निर्णय झाल्यावरच वंचितचा निर्णय आम्ही जाहीर करू. त्यांची भांडणं मिटली पाहिजेत, तरच आम्ही आमचा प्रस्ताव देऊ.

उद्या (शनिवारी) आम्ही मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घोषित करणार आहोत. जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा स्वतंत्र लढवणार आहोत. आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आमच्या मागे लागले आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
Sanjay Raut On Prakash Ambedkar: 'प्रकाश आंबेडकरांनी मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडावा'

पण, सुरुवातीला हे आम्हाला आघाडीत घेत नव्हते. २०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची मुस्लिम मतांचे विभाजन झाले. त्यामुळे भाजपचा विजय झाला. काँग्रेस व इतर पक्षांमध्ये तुटणं त्याचा फायदा भाजपला होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com