Solapur, 03 March : मी तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला आलो नाही तर नाराज होऊ नका. सततच्या कार्यक्रमांमुळे मुख्य कामंही सुधरेनासे झाले आहे. कार्यक्रम नाही, असा एकही दिवस जात नाही. पण, प्रत्येक २० ते २२ दिवसांनी मला दवाखान्यात जावं लागतं. सततच्या उपोषणामुळे शरीरात काही राहिलं नाही, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नीटपण (दुरुस्त) होत नाही. सलाईन लावायला शीराही सापडत नाहीत, अशी वेदना मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील वडकुते या गावी एका कार्यक्रमासाठी आलेले जरांगे पाटील यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आहे. त्या कार्यक्रमावेळी एका लग्नासाठी मनोज जरांगे पाटील यांना घेऊन जाण्यासाठी दोघे आले होते, त्या वेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, मला सणासुदीच्या दिवशीही घरी जाऊ द्यायचा, त्यांचा अंदाज दिसत नाही. इथूनच मला लग्नाला घेऊन जाण्यासाठी ते टपून बसलेले आहे. ते तुमचं प्रेम आहे, हे मला कळतंय. पण मी पडलो एकटा, राज्य मोठं आणि माझा समाजही प्रचंड मोठा आहे. प्रत्येकाला वाटतंय मी त्यांच्या लेकरा-बाळांसाठी लढलाेय, झटलोय. त्यामुळे मी त्यांच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, अशी त्यांची तीव्र इच्छा असते.
इथून पुढे मोठं मन ठेवा, हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो. मी सप्ताहाला, लग्नाला आलो नाही, तर तुम्ही असं मोठं मन ठेवा, की मी नाही आलो तरी चालेल. बसल्या ठिकाणावरून आपल्या लेकरांचं कल्याण करतो ना. बस्स झालं. इतकं मोठं मन तुम्ही ठेवा. बसल्या जागेवर तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करतो. असं दररोज पळावं लागत असल्यामुळे कामंही सुधारेनात मला. दररोज काहींना काही कार्यक्रम असतो. एकही दिवस असा जात नाही कार्यक्रम नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे म्हणाले, प्रत्येक २० ते २२ दिवसांनी मला दवाखान्यात जावं लागतं. सततच्या उपोषणामुळे शरीरात काही राहिलंच नाही, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये नीटपण (दुरुस्त) होत नाही. डॉक्टरांची टीम आली होती, त्यांनी सांगितलं की, तुम्हाला काय आजार असता तर मोठ्या दवाखान्यात नेलं असतं. पण माझ्या शरीरातच काही राहिलं नसल्यामुळे सलाईन तर कुठंवर लावावं. सलाईन लावायला शीराही सापडत नाहीत. एका डॉक्टराने तर माझ्या हाडालच शीर म्हणून सलाईन लावलं होतं. हुकल्यावर म्हणतंय, हुकलं दिसतंय, अशी परिस्थिती माझी झाली आहे. ही सत्यता आहे.
मराठा समाजाला मी देव मानलं आहे, त्यामुळे मी समाजाला कधीच खोटं बोलणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तुमच्याच लेकरांसाठी लढणार आहे. पण लग्नाला आणि सप्ताहाला येणं झालं नाही, तर नाराज होत जाऊ नका. कारण सगळं एकट्याला रेटतच नाही. राज्य प्रचंड मोठं असून एका टोकापासून त्या टोकापर्यंत जाणं शक्यच नाही. मला येता आलं नाही तर मोठ्या मनाने माफ करत जावा, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.